जाहिरात

Rohit Arya Encounter: '...म्हणून मुंबई पोलिसांनी रोहित आर्यावर गोळी झाडली', वाचा एन्काऊंटरची A To Z स्टोरी

Rohit Arya Encounter All Details :  हिंसेचा बेकायदेशीर वापर आणि एखादं धेय्य गाठण्यासाठी दहशतीचं वातावरण निर्माण करणे म्हणजेच दशतवाद (Terrorism),रोहित आर्यासोबत काय घडलं? वाचा सविस्तर माहिती.

Rohit Arya Encounter: '...म्हणून मुंबई पोलिसांनी रोहित आर्यावर गोळी झाडली',  वाचा एन्काऊंटरची A To Z स्टोरी
Rohit Arya Encounter Details
मुंबई:

Rohit Arya Encounter All Details : मुंबईच्या पवईत असलेल्या एका स्टुडीओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर या एन्काऊंटरबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी आर्याच्या पायावर गोळी का मारली नाही? कमांडो फोर्स त्या ठिकाणी असतानाही तिथे मुंबई पोलिसांची टीम का तैनात झाली? रोहित आर्याचा एन्काऊंटर पूर्वनियोजीत होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच रोहित आर्याच्या एन्काऊंटरबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आर्याने महाराष्ट्र सरकारविरोधात तक्रार केल्या होत्या. सरकारने आपलं म्हणणं ऐकावं आणि ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात, या उद्देशाने आर्याने सरकारला धारेवर धरलं होतं. पण त्याने दशहतवादासारखा मार्ग निवडला. त्याने 17 लहान मुलांना जवळपास 3 तास ओलीस ठेवलं. यामुळे त्या मुलांसह त्यांच्या पालकांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागलं. पण शेवटी पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू दहशतवाद्यासारखा झाला. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी, पत्रकार सहकाऱ्यांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. तसच या घटनेची वस्तुस्थिती पाहता पोलिसांनी रोहित आर्यावर केलेल्या गोळीबाराचा निर्णय योग्य होता. हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा होता. रोहित आर्याच्या एन्काऊंटरबाबत खाली दिलेले 8 मुद्दे जाणून घ्या.

1) पोलिसांनी आर्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला

आरोपीला जिवंत पकडून कायदा-सुव्यवस्था राखणे महत्त्वाचं असतं. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये गिरगाव चौपाटीवर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचं कट-कारस्थान उघडकीस आलं. आर्या प्रकरणातही पोलिसांनी त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला. आर्याला पकडता यावं, यासाठी त्याला 2 ते 3 तास फोनवर व्यस्त ठेवलं गेलं. पोलिसांनी पालकांसोबत व्हिडीओ कॉलही केला. मुलांच्या बदल्यात स्वत:ला ताब्यात घेण्याची ऑफरली एका अधिकाऱ्याने आर्याला दिली होती. पण त्याने ती नाकारली.

2) मुलांना ओलीस ठेवण्यासाठी स्टुडीओत केले बदल

रोहित आर्याने पवईच्या स्टुडीओचा विस्तार वाढवला होता. मुलांना दिर्घकाळ बंधक करून ठेवता यावं, यासाठी त्याने स्टुडीओत बदल केले होते. पोलिसांच्या प्रत्येक हालचाली पाहता याव्यात यासाठी त्याने सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते. त्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा काही काळ सुरु राहिला. भूक, तहान आणि दहशतीच्या वातावरणामुळे मुलांचं आरोग्य बिघडत होतं. मानवनिर्मित संकट येण्यापूर्वी पोलिसांनी जी एक्शन घेतली, ती आवश्यक होती.

3) आर्या डमी टार्गेट नव्हता

पोलिसांनी आर्याच्या पायावर गोळी का मारली नाही? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, पोलीस अकॅडमीच्या फायरिंग रेंजमधील तो (आर्या) डमी टार्गेट नव्हता. तो एक माणूस होता, जो त्याची पोजिशन वारंवार बदलत होता. अशा परिस्थितीत अचूक निशाणा साधणे खूप कठीण असते.

4) जर पायावर गोळी मारली असती, तर..

जर पोलीस त्याच्या पायावर गोळी मारू शकले असते, तरीही त्याने त्याच्या हातात पिस्तूल ठेवलं असतं. पायावर गोळी लागल्यानंतरही एखादा व्यक्ती बंदुकीचा ट्रिगर दाबू शकतो. लष्करात अशी अनेक उदाहरणं आहेत, जेव्हा सैनिक जखमी झाल्यावरही फायरिंग सरुच ठेवतात. एखाद्या चुकीच्या निशाण्यामुळे आर्या कमकुवत झाला असता. पण त्याचदरम्यान तो फायरिंगही करू शकला असता. यामुळे पोलीस किंवा मुलांच्या जीवाल धोका निर्माण झाला असता.

5) आर्याकडे एअर गन होती का?

आर्याकडे एअर गन होती, असं अनेकांचं म्हणणं आहे. त्याला भीती होती म्हणून तो ही गन वापरायचा, असं समजते. पण आर्याला जर पकडलं गेलं असतं, तरच त्याच्याकडे एअर गन, टॉय गन, पिस्तुल किंवा रिव्हॉल्वर होती का, हे निश्चित झालं असतं. आर्याकडे शस्त्र होती आणि त्याने 17 मुलांना ओलीस ठेऊन व्हिडीओद्वारे धमकी दिली होती. स्टुडीओच्या सेटला आग लावण्याची धमकी त्याने दिली होती. एअर गनची एखादी गोळी कोणाच्या डोळ्याला लागली असती, तर त्यांना कायमचं अंधत्व आलं असतं. पोलिसांनी शस्त्र बाळगलेल्या व्यक्तीवर गोळीबार केला नाही, तर त्यांनी स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, यासाठी त्यांनी गोळीबार करण्याचा निर्णय घेतला.

6) हा एन्काऊंटर पूर्वनियोजीत नव्हता

1990 मध्ये एन्काऊंटर स्पेशलिस्टने जे काही केलं, त्या घटनांची तुलना या घटनेशी होऊ शकत नाही. त्यावेळच्या घटनांबाबत कस्टोडिअक किलींग्जचे आरोप करण्यात आले होते. तसच त्या घटना संशयास्पद असल्याचं नेहमीच म्हटलं जायचं. पवईचा एन्काऊंटर हा पूर्वनियोजीत नव्हता. मुलांना ओलीस ठेवल्याची खबर मिळाल्यानंतरच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलांच्या सुरक्षीततेसाठी पोलिसांनी काही सेकंदातच असा निर्णय घेतला.

7) कमांडो असतानाही मुंबई पोलीस तिथे का पोहोचले?

मुंबई पोलीस (ORT) टीम आणि कमांडो घटनास्थळी पोहोचले. कमांडो असतानाही पोलीस तिथे का पोहोचले, असा प्रश्न उपस्थित झाला. दोन्ही मुंबई पोलिसांचे भाग आहेत. विशेष खबरदारी घेण्यासाठी कमांडो टीम तिथे पोहोचली होती. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी खूप दहशतवादी असतात, ते ठिकाण सुरक्षीत करण्यासाठी कमांडो एक्शन उचलतात.

8) न्यायालयीन चौकशीसाठी पोलिसांनी सज्ज राहावं

या घटनेमुळं अनेकांना लोकप्रिय होण्याची संधी मिळाली आहे. तसच पोलिसांवर आरोपांची राळ उडवली जात आहे. एखाद्या राजकारणी किंवा पत्रकारांप्रमाणे पोलिसांना थेट व्यक्त होता येत नाही. हे प्रकरण नक्कीच न्यायालयाची पायरी चढेल. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयीन चौकशीला सामोरं जाऊन जे सत्य असेल ते उघड करावं. मला मुलांबाबत आणि त्यांच्या पालकांबाबत सहानुभूती आहे. रोहित आर्याविषयी नाही. ज्याने या मुलांना ओलीस करून ठेवलं. अनेकांनी पोलिसांना न्यायालयातील पिंजऱ्यात ठेवलं आहे. ज्या घटकांमुळे रोहित आर्याने अशाप्रकारचं अमानवी आणि बेकायदेशीर कृत्य केलं, त्याच गोष्टींकडे लक्ष राहील. ज्यामुळे अशाप्रकारची घटना घडली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com