जाहिरात

मित्र-मैत्रिणींचा बर्थडे कधी आहे? आता WhatsApp वरही मिळणार रिमाएंडर, कसं ते जाणून घ्या

व्हाट्सअॅप यूजर्सला खूश करणारं एक नवं फिचर आणण्याच्या तयारीत आहे.फेसबुकप्रमाणेच आता व्हाट्सअॅपही तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांच्या जन्मदिवसाचं रिमाएंडर देणार आहे.

मित्र-मैत्रिणींचा बर्थडे कधी आहे? आता WhatsApp वरही मिळणार रिमाएंडर, कसं ते जाणून घ्या
WhatsApp New Feature 2026

WhatsApp New Feature : व्हाट्सअॅप यूजर्सला खूश करणारं एक नवं फिचर आणण्याच्या तयारीत आहे.फेसबुकप्रमाणेच आता व्हाट्सअॅपही तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांच्या जन्मदिवसाचं रिमाएंडर देणार आहे. कंपनी एका नवीन'बर्थडे रिमाएंडर'फिचरवर काम करत आहे.यामुळे तुम्हाला इतर कोणत्या कॅलेंडर अॅपवर अवलंबून राहावं लागणार नाही. 

व्हाट्सअॅप बीटा व्हर्जनमध्ये नवं फिचर

WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार,हे नवं फिचर व्हाट्सअॅप फॉर एंड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.26.27.3 मध्ये दिसलं होतं. सध्या हे फिचर डेव्हलोपमेंट स्टेजवर आहे.म्हणजेच यावर काम चालू आहे आणि बीटा टेस्टर्ससाठी याला पूर्णपणे जारी करण्यात आलेलं नाही.जेव्हा हे फिचर पूर्णपणे तयार केलं जाईल,तेव्हा व्हाट्सअॅप यूजर्सला त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील एखाद्याच्या जन्मदिवसाला एक इन-अॅप नोटिफिकेशन (In-app notification) पाठवलं जाईल.या नोटिफिकेशनवर क्लिक करून यूजर थेट त्याच्या मित्राचा चॅट बॉक्स ओपन करू शकेल आणि तिथेच त्याला विश करू शकेल.

नक्की वाचा >>Satara News: मराठी शाळेचे 30-40 विद्यार्थी 'त्या' डोंगरावर गेले अन् आक्रित घडलं..जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

एक वेगळा बर्थडे सेक्शन मिळणार

व्हाट्सअॅप एक डेडिकेडेट बर्थडे सेक्शन बनवण्याच्या तयारीत आहे. या सेक्शनमध्ये यूजर्सला त्याची सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट दिसेल,ज्यांच्या जन्मदिवस येणार आहे.यामुळे असा फायदा होईल की, भविष्यात कोणाचे बर्थडे आहेत,हे एकाचवेळी समजेल. तसच त्यांच्या बर्थडेसाठी तुम्हाला एडवान्स प्लानिंग करता येईल.

रिपोर्टनुसार,हे फिचर तेव्हाच काम करेल जेव्हा यूजरची डेट ऑफ बर्थ व्हाट्सअॅपकडे उपलब्ध असेल.हे फिचर आता टेस्टिंग आणि डेव्हलोपमेंटवर काम करेल.प्रायव्हसी कंट्रोलबाबतही अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही.दरम्यान ,अॅपमध्ये असा कोणताच विकल्प दाखवण्यात आला नाही,ज्यामध्ये एखाद्या यूजरला माहित होईल की, त्याचा बर्थडे कोणी पाहिला आहे.मेटाने आतापर्यंत अधिकृतरित्या या फिचरची घोषणा केली नाही.तसच याच्या रोलआऊटच्या कोणत्याही टाईमलाईनचा उल्लेख केलेला नाही. या फिचरसाठी यूजर्सला आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com