जाहिरात

Satara News: मराठी शाळेचे 30-40 विद्यार्थी 'त्या' डोंगरावर गेले अन् आक्रित घडलं..जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

साताऱ्यातील कराडच्या मलकापूर येथील नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Satara News: मराठी शाळेचे 30-40 विद्यार्थी 'त्या' डोंगरावर गेले अन् आक्रित घडलं..जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
Honey Bee Attack On School Students

राहुल तपासे, प्रतिनिधी 

Satara Students Honey Bee Attack News :  साताऱ्यातील कराडच्या मलकापूर येथील नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आगाशिव डोंगरावर बियाणे रोपण करण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. जवळपास 30-40 विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मलकापूर येथील नूतन मराठी शाळेने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने आगाशिव डोंगरावर बियाणे रोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात शाळेतील पाचवी ते दहावीपर्यंतचे जवळपास 60 ते 70 विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.डोंगर चढत असताना काही विद्यार्थी शिक्षकांच्या पुढे वेगाने वर गेले.त्याचवेळी ढगाळ वातावरणामुळे अस्वस्थ झालेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागल्याने किंवा हालचाल झाल्याने मधमाशांनी विद्यार्थ्यांवर झुंडीने हल्ला चढवला. 

नक्की वाचा >> Buldhana News:फक्त बोथा जंगलच नव्हे, आता तर 'या' परिसरातही हिंसक प्राण्यांचा वावर, वन विभागाने केलं मोठं आवाहन

'विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी का घेतली नाही?'

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.मधमाशा चावू लागल्याने विद्यार्थी आरडाओरडा करत सैरावैरा पळू लागले.घटनेची माहिती मिळताच शिक्षकांनी आणि स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी आणून तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात हलविले.तेथे सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले.

या घटनेनंतर शालेय सहली किंवा पर्यावरण विषयक उपक्रमांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.शिक्षक पायथ्याशी असताना विद्यार्थी पुढे गेल्याने देखरेखीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.मात्र,या संदर्भात अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वनक्षेत्रात अशा उपक्रमांचे आयोजन करताना सुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्याची मागणी होत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com