जाहिरात

WhatsApp Big Update: व्हॉट्सॲपवर लवकरच Instagram-Telegram सारखी सुविधा! मोबाईल नंबर न देता करा चॅट

WhatsApp Big Update:  तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणालाही न देता व्हॉट्सॲप वापरायला मिळाले तर? होय! तुमचा फोन नंबर शेअर करण्याची चिंता आता लवकरच मिटणार आहे.

WhatsApp Big Update: व्हॉट्सॲपवर लवकरच Instagram-Telegram सारखी सुविधा! मोबाईल नंबर न देता करा चॅट
WhatsApp Big Update : व्हॉट्सॲप (WhatsApp) लवकरच एक मोठे फीचर घेऊन येत आहे.
मुंबई:

WhatsApp Big Update:  तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणालाही न देता व्हॉट्सॲप वापरायला मिळाले तर? होय! तुमचा फोन नंबर शेअर करण्याची चिंता आता लवकरच मिटणार आहे. लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (WhatsApp) लवकरच एक मोठे फीचर घेऊन येत आहे. या फीचरमुळे तुम्ही तुमचा फोन नंबर न देता केवळ एका युजरनेम (Username) च्या मदतीने कोणाशीही चॅट करू शकाल.

या बदलामुळे व्हॉट्सॲपची ओळख केवळ फोन नंबरवर आधारित राहणार नाही. व्हॉट्सॲप युजर्सच्या प्रायव्हसीला (Privacy) महत्त्व देत असल्याने, हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

काय आहे बदल?

सध्या तुम्हाला कोणालाही व्हॉट्सॲप मेसेज करायचा असेल, तर त्यांचा नंबर सेव्ह करावा लागतो. पण नवीन फीचरमुळे, इन्स्टाग्राम (Instagram) किंवा टेलिग्राम (Telegram) प्रमाणे तुम्हाला तुमचा युनिक युजरनेम मिळेल.

तुम्ही लोकांना तुमचा फोन नंबर न देता केवळ युजरनेम देऊ शकाल. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहील आणि अनोळखी लोकांशी संपर्क साधताना तुमचा नंबर सार्वजनिक होणार नाही.

( नक्की वाचा : Arattai vs WhatsApp: व्हॉट्सॲपला टक्कर देणारे 'अरट्टाई' ॲप कशासाठी चांगले? वाचा, 'दोघां'मधील मोठा फरक )
 

काय आहे  'युजरनेम रिझर्व्हेशन' फीचर?

व्हॉट्सॲप जेव्हा युजरनेम फीचर पूर्णपणे सुरू करेल, तेव्हा तुम्हाला तुमचे पसंतीचे नाव लगेच मिळावे यासाठी कंपनीने खास सोय केली आहे. याला 'युजरनेम रिझर्व्हेशन' फीचर म्हणतात. समजा, व्हॉट्सॲपने हे फीचर टप्प्याटप्प्याने (Gradually) जारी केले, आणि सुरुवातीला काहीच देशांना मिळाले. अशा वेळी, त्या देशांतील लोक लगेच 'Shahrukh' किंवा 'Priyanka' सारखे लोकप्रिय युजरनेम घेऊन टाकतील. यामुळे इतरांना ते नाव मिळणार नाही.

हा अन्याय टाळण्यासाठी, व्हॉट्सॲप मुख्य फीचर येण्यापूर्वीच युजर्सना आपले आवडते युजरनेम आरक्षित (Reserve) करण्याची संधी देणार आहे. यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळेल.

( नक्की वाचा : Arattai vs WhatsApp: व्हॉट्सॲपचा खेळ खल्लास? Zoho च्या 'अरट्टाई' ॲपमध्ये Meta ला नमवणारे 5 पॉवरफुल फीचर्स! )
 

हे फीचर कधी आणि कुठे दिसेल?

'WABetaInfo' च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.25.28.12 मध्ये या 'युजरनेम रिझर्व्हेशन' फीचरवर काम सुरू आहे. हे फीचर तुमच्या व्हॉट्सॲपमधील प्रोफाइल सेक्शनमध्ये, तुमचा फोन नंबर दिसतो त्याच्या खाली उपलब्ध होण्याची शक्यता आहे. युजर्स मुख्य युजरनेम प्रणाली सुरू होण्यापूर्वीच इथे आपले पसंतीचे नाव नोंदवून सुरक्षित करू शकतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com