White Leopard Video : नाशिकमध्ये खळबळ! 'या' भागात पहिल्यांदाच आढळला पांढरा बिबट्या, धडकी भरवणारा व्हिडीओ

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचहगातातील ऊसशेतीत बिबट्याची नवजात पिल्ले आढळून आली. यामध्ये पांढऱ्या बिबट्याचाही समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
White Leopard Spotted In Nashik

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik White Leopard Viral Video : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचहगातातील ऊसशेतीत बिबट्याची नवजात पिल्ले आढळून आली. दिंडोरी वनपथकाने धाव घेत पिल्लांना रेस्क्यू केले होते. त्यापैकी एकाची त्वचा पांढरी असल्याचे आढळून आल्याने नाशिक डिव्हिजनच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने दहा दिवसांच्या तीनही बछड्यांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणली. पांढऱ्या त्वचेचा बछड़ा आढळून येण्याची नाशिकमध्ये पहिलीच घटना आहे.

दिंडोरी उनपरिक्षेत्रातील चाचहगाव शिवारात असलेल्या एका ऊसशेतीमध्ये काही दिवसांपूर्वी 3 नवजात बछडे क्षेतमजुरांना दिसले होते. वनविभागाला माहिती मिळताच पथकाने तिनही पिल्लांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एका बछड्याचा रंग पांढरा असल्याचे आवळून आले.त्याच्या त्वचेवर हलके काळे ठिपके काही ठिकाणी दिसत होते.त्यामुळे वनविभागाने 'रेस्क्यू'च्या पथकाला पाचारण केले.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan Dombivali News : डोंबिवलीत ठाकरे गटाला तर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, काय घडलंय?

पथकाने टीटीसीमध्ये बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली

पथकाने टीटीसीमध्ये आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता सहा दिवसांपूर्वी ते जन्माला आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला यानंतर सायंकाळी पथक पुन्हा बछड्यांना घेऊन चाचडगावातील ऊसशेतीत पोहोचले. जनपथकाने आई आणि बछड्यांची पुन्हा भेट घडविण्यासाठी एका टोपलीखाली पिल्लांना झाकून ठेवले. परिसरात ट्रैप कॅमेरेही लावण्यात आले होते.रात्रीच्यावेळी बिबट्या मादीने येऊन तीनही पिल्लांना अबठ्यात धरून सुरक्षित अधिवासात हलविले

इथे पाहा पांढऱ्या बिबट्याचा व्हिडीओ 

गतवर्षी एप्रिलमध्ये अशाचप्रकारे बिबट्याचा पांढऱ्या रंगाचा नवजात बाछड़ा रत्नागिरीमध्ये आढळून आला होता. ही महाराष्ट्रातील पहिली घटना होती.यापूर्वीही कधीही पांढरा बिबट्या कुठेही दिसला नव्हता.त्यानंतर नाशिकमध्ये मार्च महिन्यात साधारणतः आठवडाभरापूर्वी दिंडोरीत पांढऱ्या बिबट्याचा बछड़ा जन्माला आल्याची नोंद वनविभागाकडून करण्यात आली आहे.