जाहिरात

Kalyan Dombivali News : डोंबिवलीत ठाकरे गटाला तर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, काय घडलंय?

डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाला तर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.टिटवाळ्यातील  शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

Kalyan Dombivali News : डोंबिवलीत ठाकरे गटाला तर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, काय घडलंय?
Kalyan Dombivali Political News Today
मुंबई:

Kalyan-Dombivali Political News Today : डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाला तर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.टिटवाळ्यातील  शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.कल्याणचे मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. कल्याण डोंबिवलीसाठी आजचा दिवस विशेष होता.कारण डोंबिवलीत भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

कार्यकर्त्यांचा अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. टिटवाळ्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले जात होते. आज सकाळी मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. 

नक्की वाचा >> Dombivali News: शाळकरी विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय, 'या' गावातील लोकांचं रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत आंदोलन

केडीएमसी निवडणुकीदरम्यान हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले होते.विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये शिवसेना मनसेची युती आहे.एवढेच नाही तर या दोन्ही पक्षांचा एकच गट आहे.एकच गट नेता असताना  शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनसेत प्रवेश केल्याने एकच चर्चेला उधाण आलं आहे. 

राज साहेब ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.यापुढे देखील मनसेत मोठी इनकमिंग होणार आहे, अशी प्रतिक्रिया कल्याणचे मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Mhada Lottery : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, 'या' तारखेला होणार 'गो लाईव्ह'

"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब,खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार विश्वनाथ भोईर यांनी याभागात अनेक विकास कामे केलेली आहेत.  तसेच अनेक कामे प्रस्तावित आहेत. या भागातील लाडक्या बहिणीला महापौर पद दिलेले आहे. काम जोरात सुरू आहे तरीही काही लोकं नाराज होऊन पक्ष सोडून जात असतील तर हे या भागाचे दुर्दैव आहे",अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक मयुर पाटील यांनी दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com