Shocking news: कोण आहे ​फय्याज प्रेमजी? ज्याने जुलूसमध्ये 30 हजार लोकांना मारण्याचा रचला कट

तो म्हणाला मला किमान 15 हजार लोकांना मारायचे होते, अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे. हे ऐकून पोलीस ही हादरले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुहर्रमच्या जुलूसात झिंक फॉस्फाईड या विषारी रसायनाचे वाटप रोखण्यात मुंबई पोलीस यशस्वी झाले आहे
  • आरोपी फय्याज प्रेमजी याला अटक करण्यात आली असून त्याने १५ हजार लोकांना मारण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे
  • फय्याज प्रेमजी पुण्याचा रहिवासी असून त्याने ऑनलाइन ५० किलो झिंक फॉस्फाईड मागवले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मुहर्रमच्या जूलुसमध्ये एक मोठा कांड रोखण्यात मुंबई पोलीसांना यश आलं आहे. मुंबईतील भायखला येथे मुहर्रमच्या आशूरा जुलूसदरम्यान हा प्रकार घडला. या जूलुसमध्ये वेदनाशामक आणि इम्युनिटी बुस्टरच्या नावाखाली 'झिंक फॉस्फाईड' हे धोकादायक रसायन वाटण्यात आलं. या प्रकरणी फय्याज प्रेमजी या आरोपीला अटक करण्यात आली. त्याने पोलीस चौकशीत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला मला किमान 15 हजार लोकांना मारायचे होते, अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे. हे ऐकून पोलीस ही हादरले आहे. आरोपी फय्याज निसार हुसैन प्रेमजी याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शनिवारी रात्री न्यायालयात हजर केले. त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फय्याज प्रेमजी हा उच्च शिक्षित आहे. त्याने बीबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या वडीलांनी कंपनी आहे. आधी तो याच कंपनीत काम करत होता. तो पुण्याचा रहिवाशी आहे. तो पत्नी पासून विभक्त राहतो. तर त्याचे कुटुंबीय इराणमध्ये राहत असल्याचं समोर आलं आहे. त्याने इराण-इराकमध्ये काम केले आहे.  पंधरा दिवसापूर्वीच तो मुंबईत आला  होता. मुंबईत तो डोंगरी इथं एका लॉजवर राहीला. तिथेच त्याने 50 किलो झिंक फॉस्फाइड आणि 30 हजार अँटीबायोटिकच्या कॅप्सूल मागवल्या. त्या ऑनलाईन मागवल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीच्या डोक्यात मोठा कट शिजला होता. त्यानुसारच तो  जुलूसमध्ये सहभागी झाला होता. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News : मोहरमच्या जुलूसमधील 30 हजार जणांना संपवण्याचा प्लान? कॅप्सूलबाबत उपायुक्तांची धक्कादायक माहिती

त्याने या जूलुसमध्ये महिलांना लक्ष करण्याचं ठरवलं होतं. त्याने केवळ महिलांना औषधाच्या नावाखाली या कॅप्सूल दिल्या नाहीत, तर गर्दीचा फायदा घेऊन काहींना 'चॉकलेट' सांगून या गोळ्या हवेत उडवल्या. या कॅप्सूलमध्ये धोकादायत 'झिंक फॉस्फाईड' भरलेले होते. ज्याचा वापर प्रामुख्याने उंदीर मारण्याचे औषध म्हणून केला जातो. ते खाल्ल्यावर काही क्षणात मृत्यू होवू शकतो. ​जुलूसदरम्यान फसवणुकीमुळे आतापर्यंत सुमारे 11 लोकांनी या विषारी कॅप्सूल खाल्ल्याचे समोर आले आहे.  या गोळ्या खाल्ल्यानंतर सर्वांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर या सर्वांना रुग्णालयत हलवण्यात आलं. त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू ही करण्यात आले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व 11 जण ठिक आहे. त्यांनी उपचाराला ही प्रतिसाद दिला. डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नुसार हे सर्व जण आता धोक्याबाहेर आहेत. त्यांना लवकरच घरी सोडले जाणार आहे. त्यानंतर ते आपल्या घरी जावू शकतात. या नागरिकांना ही या घटनेनंतर धक्का बसला आहे. 

नक्की वाचा - Mumbai News : झिंक फॉस्फाइड काय आहे? मुंबईतील मोहरम जुलूसमधील घातक कॅप्सूलचं पुणे कनेक्शन

​फय्याज प्रेमजी याने वाटलेले ​झिंक फॉस्फाईड हे अत्यंत विषारी रसायन आहे. पोटात गेल्यानंतर ते पोटातील ॲसिडसोबत प्रक्रिया करते. त्यामुळे 'फॉस्फरस गॅस' तयार करते. हा वायू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असून तो हृदय, फुफ्फुसे, लिव्हर आणि मेंदूवर थेट हल्ला करतो. या विषावर कोणतेही थेट अँटीडोट उपलब्ध नाही. त्यामुळे थेट मृत्यू होवू शकतो. इतके घातक हे रसायन आहे.  मुंबईच्या रे रोड येथील रहमताबाद कब्रस्तानजवळ एका महिलेला मोफत कॅप्सूल वाटणाऱ्या लोकांवर संशय आला. तिने एक कॅप्सूल उघडून पाहिली असता त्यात वेगळीच पावडर आढळली. महिलेने तातडीने भायखला पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून 14,900 कॅप्सूल जप्त केल्या आहेत. आरोपीने 30,000 रिकाम्या कॅप्सूल आणि 50 किलो फॉस्फरसची ऑर्डर दिली होती. पोलीस आता या प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शन काय आहे हे तपासत आहेत. शिवाय यात काही दहशतवादी अँगल आहे का ते ही पाहत आहेत.