जाहिरात

Mumbai News : मोहरमच्या जुलूसमधील 30 हजार जणांना संपवण्याचा प्लान? कॅप्सूलबाबत उपायुक्तांची धक्कादायक माहिती

मुंबई पोलिसांनी तब्बल १४ हजार कॅप्सूल जप्त केले असून यातून लोकांच्या हत्येचा प्लान आखण्यात आल्याची माहिती आहे.

Mumbai News : मोहरमच्या जुलूसमधील 30 हजार जणांना संपवण्याचा प्लान? कॅप्सूलबाबत उपायुक्तांची धक्कादायक माहिती

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. २६ जून रोजी मोहरमच्या दिवशी तब्बल ३० हजार लोकांना संपवण्याचा प्लान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईतील रे रोड भागातील रेहमताबाद कब्रस्तानजवळील अशुरा मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांचा एक कॅप्सूल देण्यात आलं होतं. या कॅप्सूलच्या माध्यमातून तब्बल ३० हजार लोकांचा संपवण्याचा प्लान असल्याचं सांगितलं जात आहे. 

एकाला अटक....

या प्रकरणात फय्याज निसार हुसेन प्रेमजी नावाच्या  ३९ वर्षाच्या तरुणाकडून अशा प्रकारच्या कॅप्सूल वाटले जात होते. एका महिलेला ही बाब संशयास्पद वाटली आणि तिने तातडीने पोलिसांना बोलावलं. त्यानंतर प्रेमजीचा हा कट उधळण्यात आला आहे. 

त्या कॅप्सूलमध्ये काय होतं? 

मोहरमच्या जुलूसमध्ये नागरिकांना झिंक फॉस्फाईड कॅप्सूल देत मारण्याचा कट होता अशी माहिती समोर आली आहे. प्रेमजी या तरुणाने मोहरमच्या जुलूसमध्ये नागरिकांना पेन किलर म्हणून या कॅप्सूलची विक्री केली. भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संशयित व्यक्ती कॅप्सूल विकत होती. पेन किलर म्हणून ही कॅप्सूल विकली जात होती. अशा प्रकारच्या विक्रीसाठी त्याच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. जुलूसमधील काहींनी ती कॅप्सूल खाल्ल्याचा अंदाज आहे. त्यापैकी सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची कॅप्सून खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली. त्याचं पोट दुखू लागलं आणि त्याला उलटी झाली. प्रेमजीने या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड टाकलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेमजीने ३० हजार रिकाम्या कॅप्सूल आणि ५० किलो फॉस्फरसची ऑर्डर केली होती. प्रेमजी या तरुणाने बीबीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. तो इराण आणि इराकलाही जाऊन आल्याचं सांगितलं जात आहे, DCP जयंत मीना यांनी याबाबत माहिती दिली.

नक्की वाचा - Badlapur News : आज भांडण अन् दुसऱ्या दिवशी पत्नीचा हॉर्ट अटॅकने मृत्यू; पोस्टमार्टमनंतर पतीचं भयंकर कृत्य उघड

झिंक फॉस्फाईड काय आहे? 

झिंक फॉस्फाईडचा उपयोग उंदीरनाशक म्हणून केला जातो. बऱ्याचदा पिकांचं नुकसान करणाऱ्या उंदरांवर नियंत्रण आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ही पावडर मानव आणि पाळीव प्राण्यासाठी विषारी मानली जाते. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com