- मुंबई के मुहर्रम जुलूस में जिंक फॉस्फाइड से भरे कैप्सूल इम्यूनिटी बूस्टर बताकर बांटे गए थे
- जिंक फॉस्फाइड अत्यंत जहरीला पदार्थ है जो शरीर में जाकर गंभीर मल्टी-ऑर्गन फेल्योर कर सकता है
- इस जहरीले पदार्थ के सेवन पर उल्टी, पेट दर्द, चक्कर, सांस लेने में कठिनाई जैसे लक्षण प्रकट होते हैं
Mumbai News : मुंबईतील मोहरम जुलूसदरम्यान लोकांना घातक केमिकल झिंक फॉस्फाइडने भरलेली कॅप्सूल वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कॅप्सूलचं सेवन केल्याने अनेक लोकांचा जीव धोक्यात सापडला आहे. आरोपी पेन किलर आणि इम्युनिटी बुस्टर असल्याचं सांगत जुलूसमध्ये वाटत होता. मुंबई पोलिसांच्या तपासात या संपूर्ण प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
मुंबईतल्या भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी लोकांना पेन किलरच्या गोळ्या असल्याचं सांगत चक्क उंदीर मारण्याच्या औषधाच्या गोळ्या वाटण्यात आल्या. या गोळ्या घेतल्यानं काही तरुणांची प्रकृती बिघडलीय. त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या गोळ्या वाटणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी रंगेहात अटक केलीय. आणि त्याच्याकडून तब्बल 14 हजार विषारी गोळ्या जप्त करण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं तब्बल 30 हजार रिकाम्या कॅप्सूल आणि 100 किलो झिंक फॉस्फाईडची ऑनलाईन ऑर्डर केली होती.

या प्रकरणातील आरोपी फैयाज प्रेमजी असून तो पुण्यातील विमाननगर परिसरातील रहिवासी आहे. हा आरोपी काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे 2025 मध्ये आरोपीनं इराण आणि इराकचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू करण्यात आला आहे.
प्रत्येक कॅप्सूलमध्ये एक ग्रॅम झिंक फॉस्फाइड...
झिंक फॉस्फाइड एक अत्यंत विषारी रासायनिक पदार्थ आहे. याचा वापर सर्वसाधारणपणे घर आणि शेतात उच्छाद मांडणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी केला जातो. झिंक फॉस्फाइड शरीरात गेल्यानं गंभीर पॉयजनिंग होऊ शकतं आणि जीव जाण्याची भीती असते. पोटात गेल्यानंतर हे रसायन पोटातील अॅसिडसह प्रतिक्रिया करीत फॉस्फीन गॅस तयार करतं. हा गॅस शरीरासाठी अत्यंत घातक असतो. ज्याचा थेट परिणाम हृदय, फुप्फुसं, लिव्हर, किडनी आणि मेंदूवर होतो.
शरीरावर होणारे परिणाम
शरीरातील पेशींना ऑक्सिजन वापरण्याची प्रक्रिया बाधित होते
हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात
रक्तदाब झपाट्याने कमी होऊ शकतो
श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
अनेक अवयव निकामी होण्याचा धोका
झिंक फॉस्फाइडच्या सेवनानंतर दिसणारी लक्षणं...
सातत्याने उलट्या होणं
अस्वस्थ वाटणं
पोटात वेदना जाणवणं
उलट्यांमधून तीव्र वास येणं
चक्कर येणं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world