Vaishnavi Hagavane Case : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी तिच्या आई-वडिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होतं असं वैष्णवीचे वडील आणि इतरांच्या बोलण्यातून समोर येते होते. बाळाला आणण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या नातेवाईकांना निलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचाही आरोप होत आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांच्यातक्रारीवरुन निलेश चव्हाणविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सर्व घटनांमधून हा निलेश चव्हाण नेमका आहे तरी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. निलेश चव्हाणबाबत आता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. निलेश चव्हाणवर देखील त्याच्या पत्नीने छळासह, बळजबरीने संबंध ठेवल्याचे गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे.
(नक्की वाचा- Pune Crime: वैष्णवीला निर्दयीपणे मारहाण, नंतर मटणावर ताव... हगवणे पिता-पुत्राचा धक्कादायक VIDEO)
कोण आहे निलेश चव्हाण?
निलेश चव्हाणचा बिल्डर असून त्याचा पोकलेन मशीनचा देखील व्यवसाय आहे. निलेश शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्या वादात देखील त्याचा अनेकदा असायचा. यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा.
छुप्या कॅमेऱ्याने बनवले बायकोचेच आक्षेपार्ह व्हिडीओ
निलेश चव्हाण पत्नीसोबत विकृत चाळे करायच अशी माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाणने आपल्या बेडरुममध्ये फॅन, एसीला स्पाय कॅमेरे बसवले होते. पत्नीला संशय आला त्यावेळी तिने निलेशकडे विचारणा केली होती. त्यावेळी निलेशने उत्तर देणे टाळले होते. मात्र निलेशच्या पत्नीने त्याच्या लॅपटॉपची तपासणी केली त्यावेळी त्यात त्यांच्या शरीरसंबंधांचे अनेक व्हिडीओ सापडले होते. याशिवाय निलेशच्या पत्नीला आणखी काही मुलीसोबतचे व्हिडीयो देखील सापडले होते.
(नक्की वाचा- Vaishnavi Hagavane: 'सासऱ्याने कपडे फाडले, दिराने खाली पाडले' वैष्णवीच्या मोठ्या जावेने सर्वच सांगितलं))
पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध
पत्नीने जाब विचारला तेव्हा निलेशने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पत्नीचे विरोध असतानाही निलेशने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. निलेशच्या घरच्यांना याबद्दल माहिती दिली त्यावेळी त्यांनी सूनेचाच छळ सुरु केला. अखेर या त्रासाला कंटाळून निलेशच्या पत्नीने घर सोडलं आणि याबाबत पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनुसार 2022 मध्ये निलेशविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.