BMC : संदीप देशपांडेंशी घट्ट मैत्री, राज ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे संतोष धुरी कोण आहेत? 

Maharashtra Election 2026 : संतोष धुरी हे मनसेचे माजी नगरसेवक. मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि धुरी यांच्यात घट्ट मैत्री आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Election 2026 : ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. कट्टर मनसैनिक संतोष धुरी भाजपच्या वाटेवर आहेत. ५ जानेवारी रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते नितेश राणेही त्यांच्यासोबत होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरी यांनी मनसेची साथ सोडली असून ते आज ६ जानेवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९४ मधून संतोष धुरी इच्छुक होते. मात्र ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्यानं संतोष धुरी नाराज झाले होते. अशातच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने ठाकरे गटासाठीही मोठं आव्हान असणार आहे. ठाकरे गटाकडून या जागेवरुन सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे निवडणूक लढवणार आहेत. सुनील शिंदे हे ठाकरेंचे विधानपरिषदेचे आमदार. सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळी हा आपला मतदारसंघ सोडला होता. त्यानंतर सुनील शिंदे यांना शिवसेनेने विधानपरिषदेत संधी दिली आणि आता त्यांच्या भावासाठी १९४ हा वॉर्ड स्वत:जवळ ठेवला, असं म्हटलं जातं. 

नक्की वाचा - BMC Election 2026: देवेंद्र फडणवीसांनी वरळीत गेम फिरवला, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

संतोष धुरी कोण आहेत? l Who is Santosh Dhuri

परिणामी संतोष धुरी यांना १९४ वॉर्डमधून संधी मिळू शकलेली नाही. संतोष धुरी हे मनसेचे माजी नगरसेवक. मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि धुरी यांच्यात घट्ट मैत्री आहे. गेल्या मनपा निवडणुकीतही धुरी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी आघाडीवर होते.

Advertisement