मेहबुब जमादार, प्रतिनिधी
Alibaub Bull Race Latest News : अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आणि मैत्री बैलगाडी ग्रुप,हेमनगर व चिखली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.रायगडमधील सर्वात उत्कृष्ट मैदान म्हणून ओळखला जाणारा चिखली परिसर या स्पर्धेमुळे गजबजून गेला.स्पर्धेसाठी 20 गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी फॅन,सिलेंडर शेगडीसह इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. फायनल फेरीत एक ते चार क्रमांकासाठीही बक्षिशांची खैरात होती.तसेच प्रेक्षक वर्गासाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये एक बैल जोडी आणि बोकड, अशी बक्षिसे ठेवल्याने शर्यतीचा सोहळा अधिक रंगतदार झाला.
या बैलगाडा शर्यतीत कोण जिंकलं?
बैलगाडा स्पर्धेच्या सेमी फायनलच्या फेरीत ताडवागळे-वडवली येथील युवासेना उपतालुका अधिकारी संकेत पाटील यांच्या बैलगाडीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी,शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित नाईक,उपसरपंच रसिकाताई केणी,बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील (बाळ्या दादा),उत्तमशेठ पाटील,कुर्डूस विभाग प्रमुख स्वप्निल पाटील, जीवन पाटील,युवा सेना उपतालुका प्रमुख संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.शर्यती पाहण्यासाठी तालुक्यातील बैलगाडी प्रेमी,बैलगाडी चालक-मालक आणि परीसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
नक्की वाचा >> Viral Video: चीनी मुलगी भारतीय तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली, लग्नमंडपात नवरीचे संस्कार पाहून सासू-सासरे खुश!
"बैलगाडी शर्यत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ"
यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणाले की, बैलगाडी शर्यत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ असून त्याचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या बैलगाडी स्पर्धांप्रमाणेच चिखलीचे मैदान देखील राज्यातील सर्वोत्तम ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.खेळातील जोखीम लक्षात घेऊन आयोजकांनी केलेली व्यवस्था कौतुकास्पद असून आगामी काळात या खेळाला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन आमदार दळवी यांनी केले.