Chinese Bride India Marriage Viral Video : प्रेमाला वय नसतं..प्रेम आंधळ असतं..प्रेमात रंगाचा, चेहऱ्याचा भेदही नसतो, असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण खऱ्या प्रेमाच्या अशा अनेक कहाण्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. तरुण पिढीच्या खऱ्या प्रेमाच्या अनेक लव्ह स्टोरीज व्हायरल झाल्याच्या पाहायला मिळतात. झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात एक अनोखी आणि मनाला स्पर्श करणारी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका चीनी तरुणीचं भारतात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम जडलं. त्यानंतर ती तरुणी प्रेमात इतकी बुडाली की, ती चक्क चीन देश सोडून भारतात आली अन् प्रियकर चंदनसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या या प्रेमकहाणीचा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, चीनच्या हैवेई प्रांतातील छियाओ-जियाओ नावाची तरुणी भारतीय प्रियकर चंदन सिंहच्या प्रेमात इतकी बुडाली की तिने हजारो किलोमीटर दूर भारतात येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा अनोखा विवाह 6 डिसेंबर रोजी साहिबगंज जिल्ह्यातील लोकप्रिय विनायक हॉटेलमध्ये वैदिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पार पडला.
चंदन आणि छियाओ-जियाओ या कपलची भेट नेमकी कुठे झाली?
साहिबगंजचे रहिवासी चंदनच्या प्रेमकहाणीची सुरुवात लंडनपासून झाली. चंदन आणि छियाओ-जियाओ यांची भेट चीन आणि लंडनमध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. अभ्यासाच्या निमित्ताने सुरू झालेली मैत्री हळूहळू लैला-मजनूसारख्या प्रेमात बदलली आणि दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
इथे पाहा या जोडप्याचा व्हायरल व्हिडीओ
विदेशी बेटी संग साहिबगंज के बेटे ने रचाई शादी
— NDTV India (@ndtvindia) December 8, 2025
झारखंड के साहिबगंज जिले में एक अनोखी और दिल छू लेने वाली प्रेम कहानी शादी के रूप में मुकम्मल हो गई,चीन के हैवेई प्रांत की रहने वाली बेटी छियाओ-जियाओ अपने भारतीय प्रेमी चंदन सिंह के प्यार में इस कदर डूबीं कि उन्होंने हजारों किलोमीटर… pic.twitter.com/iohe7mB87R
चंदनचे वडील शंभू शंकर सिंह यांनी मुलाच्या निर्णयाचा आदर करत संपूर्ण विधी परंपरेसह लग्नाचे आयोजन केले. साहिबगंजमधील सर्वात चर्चित विनायक हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात कुटुंबातील सदस्य,नातेवाईक आणि मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैदिक मंत्रोच्चाराच्या वातावरणात दोघांनी सात फेऱ्यांसह एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world