Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या काराभारावर चहूबाजूने टीका झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका झाली. विरोधकांनी चाकणकर यांना धारेवर धरलंच. मात्र आता राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर महायुतीत मित्रपक्ष देखील नाराज असल्याची चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीतील शिवसेना आणि भाजपा पक्षाच्या काही नेत्यांनी रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्ष म्हणून पूर्णवेळ देत नाहीत, असा आरोप करत आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावरून होत असेलल्या टीकेवरूनही त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरूनच काही महिला शिष्टमंडळ आज राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. त्याचवेळी उपसभापती निलम गोरे यांनी देखील बैठकीचे आयोजन केले आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोग अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे. यामुळे त्या दोन्हीकडे योग्य जास्त वेळ देत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
( नक्की वाचा : Adani Ports NCDs : अदाणी पोर्ट्सने 15 वर्षांच्या NCDs मधून 5000 कोटी उभारले, सर्वात मोठा देशांतर्गत बॉन्ड LIC कडून सबस्क्राईब )
विरोधकांसोबत काही सत्ताधारी देखील चाकणकरांवर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे चाकणकर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. चाकणकर यांना एकच पद द्यावे, असं महायुती मित्र पक्षाकडून बोललं जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोग अथवा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद यापैकी एक पद सोडण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.