OLA बाईकचं पेट्रोल संपलं! महिला ड्रायव्हरसोबत पंपापर्यंत 1KM चालली, रात्री घरी पोहोचताच आईसमोर रडली अन्..

Woman And Ola Driver Shocking Viral News : जयपूरच्या एका महिलेनं ओला बाईक राईडसोबतचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची इंटरनेटवर एकच चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
OLA Driver Viral News
मुंबई:

Woman And Ola Driver Shocking Viral News : जयपूरच्या एका महिलेनं ओला बाईक राईडसोबतचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची इंटरनेटवर एकच चर्चा रंगली आहे.काही लोकांना वाटतंय की, ही किरकोळ घटना आहे.पण अनेक लोकांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सहानुभूती आणि माणुसकीचा मोठा धडा शिकवला आहे. आयुषी नावाच्या एका महिलेनं लिंक्डईनवर तिची स्टोरी पोस्ट केली आहे.तिने म्हटलं की ऑफिसमधून घरी परतताना तिने एक ओला बाईक बुक केली होती.पण प्रवासादरम्यान ड्रायव्हरने बाईक थांबवली. कारण पेट्रोल संपलं होतं. त्यानंतर असं काही घडलं जे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

महिलेनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय, काल कार्यालयातून घरी जाताना मी ओला बाईक बुक केली. पण पेट्रोल संपवल्यानं ड्रायव्हरने रस्त्यातच बाईक थांबवली.आता माझ्याकडे दोन मार्ग होते.एका होता राईड संपवण्याचा आणि दुसार होता दुसरी कॅब बुक करण्याचा..ड्रायव्हरसोबत जवळच्या पेट्रोलपंपावर जावं का? असाही प्रश्न पडला. पण मी दुसरा मार्ग निवडला.

नक्की वाचा >> रायगडमध्ये मोठं हत्याकांड! मुलांनी वृद्ध माय बापाला संपवलं, बेडवर सापडला दोघांचा मृतदेह, 24 तासांतच गेम पलटला!

"आम्ही पेट्रोल पंपावर पोहोचलो आणि त्याने.."

आम्ही जवळपास एक किलोमीटर एकत्र चाललो. मला घरी पोहोचायला उशीर होत होता. काही वेळानंतर आम्ही पेट्रोल पंपावर पोहोचलो आणि त्याने पेट्रोल भरलं.त्यानंतर आम्ही प्रवास केला आणि त्याने मला घरी सोडलं. 101 रुपये भाडं झालं. मी पेमेंट केलं आणि घराच्या दिशेनं जायला निघाली. त्याने मागून हाक मारली आणि म्हटलं, मॅडम 108 रुपये होतात. मी त्याला म्हटलं, आतातर 101 रुपये दाखवत होते. त्यावर तो म्हणाला माहित नाही. कदाचित वाढलं असेल. मी त्याला आणखी सात रुपये दिले आणि गुपचूप घरी गेली. घरी आल्यावर आईसमोर रडली. 7 रुपयांसाठी नाही, तर यासाठी की मला त्यावेळी वाटलं, माझी सहानुभूती नष्ट झाली आहे. 

"त्या दिवशी मी 3 गोष्टी शिकले"

मी पण त्याच्या संकटात त्याला साथ दिली. पण त्याने त्याच प्रवासासाठी जादा पैसे मागितले. जे त्याच्या चुकीमुळं घडलं होतं. त्यादिवशी मी तीन गोष्टी शिकलो, सहानुभूतीत व्यवहार होत नसतो. जे लोक संघर्षात जगतात, त्यांना नेहमीच दुसऱ्यांची दया वाटत नाही. तुमच्या चांगल्या कर्माची किंम्मत तुम्हाला नक्की मिळते. या लिंक्डईन पोस्टला 2 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत आणि शेकडोंच्या संख्येत कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की,हा डोळे उघडणारा अनुभव आहे. दुसऱ्या एकाने म्हटलं की, आपल्याला आपल्या अपेक्षा कमी करायला पाहिजेत. 

Advertisement

नक्की वाचा >> CCTV : सर्वात भीषण अपघात! 12 माणसं आणि 17 गाड्यांना डंपरने उडवलं..व्हिडीओ पाहून पायाखालची जमिनच सरकेल

Topics mentioned in this article