Navi Mumbai : खासगी फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेची आत्महत्या, लिव्ह-इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल

Crime News : वसईतील संदीप जाधव (३७) मृत महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. संदीप याने महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडून १० लाख रुपये उकळले.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, नवी मुंबई

नवी मुंबईतील रबाळे परिसरात ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरविरोधात रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच दमबाजी, मारहाण, आणि खाजगी फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटावळे गाव, रबाळे येथील राहिवासी असलेल्या पीडित महिलेने ८ जुलै २०२५ रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीने ११ जुलै रोजी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

(नक्की वाचा- Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल)

या तक्रारीनुसार, वसईतील संदीप जाधव (३७) मृत महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. संदीप याने महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडून १० लाख रुपये उकळले. त्यानंतर महिला त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागल्यावर आरोपीने तिचे खाजगी फोटो व व्हिडीओ तिच्या नातेवाइकांना व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

इतकेच नव्हे, आरोपी संदीप जाधवने महिलेच्या दोन्ही मुलींना सतत फोन करून अश्लील व दमदाटीचे संदेश पाठवले व धमक्या दिल्या. तसेच, पीडितेला वारंवार मारहाण व शारीरिक छळ केल्याचीही माहिती समोर आली आहे. या मानसिक व शारीरिक त्रासामुळे पीडित महिलेने आत्महत्या केली, असा आरोप मृत महिलेच्या मुलीने तक्रारीत केला आहे.

Advertisement

(नक्की वाचा- BMC Election : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टाळीची चर्चा, पण काँग्रेसचं काय चाललंय? वाचा Inside Report)

या प्रकरणी रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ – आत्महत्येस प्रवृत्त करणे, कलम ७७ – विनयभंग व कपटाने स्त्रीचे खाजगी क्षण चित्रीत करणे (वॉयरिझम), कलम ३१६(२) – फसवणूक करून विश्वासघात, कलम ७४ – महिलेसोबत अश्लील वर्तन/अवमान, कलम ११५(२) – जाणूनबुजून दुखापत करणे, कलम ३५२ – अपमान व भांडण घडवून आणण्याचा प्रयत्न, कलम ३५१(३) – धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२१ ते ८ जुलै २०२५ दरम्यान हे सर्व प्रकार घडले. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आतापर्यंत कोणताही अटक झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Topics mentioned in this article