लाडकी बहीणीची फरफट, अर्ज भरताना ना-ना अडचणी

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गेल्या असता त्यांना आलेला अनुभव हा भयंकर होता. 'योजना नको, पण यंत्रणा आवर' अशी बोलण्याची वेळ त्या महिलांवर आली.

Advertisement
Read Time: 3 mins
नाशिक:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सरकारने घोषणा केली. योजनेला मुदवाढही देण्यात आली. काही अटीशर्ती शिथिल करण्यात आल्या. शिवाय अर्ज भरण्याची प्रक्रीया सुलभ असेल. महिलांना अर्ज करताना त्रास होणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवाय जे कर्मचारी अधिकारी पैशांची मागणी करतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.या घोषणेने खुषीत असलेल्या महिला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गेल्या असता त्यांना आलेला अनुभव हा भयंकर होता. 'योजना नको, पण यंत्रणा आवर' अशी बोलण्याची वेळ त्या महिलांवर आली. हा संपुर्ण प्रकार घडला आहे नाशिकमध्ये.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अर्ज भरण्यात अडचणी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना घोषणा केली खरी, मात्र प्रत्यक्षात या योजनेचा लाभ घेता येत नसल्याने बहिणी मात्र त्रस्त झाल्याचं चित्र नाशिकमध्ये बघायला मिळालय. वेबसाईटवर ही सुविधा अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाही असा आरोप होत आहे. सेतू केंद्रांवर या योजनेचा अर्ज भरता येत नाहीये. त्यामुळे अनेक सेतू केंद्रांवर महिलावर्ग आणि सेतू केंद्र चालकांमध्ये वादाच्या घटना घडतायत. शासनाच्या नारीशक्ती दूत ऍपवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं सेतूचालक सांगत आहेत. मात्र  सर्व्हर डाऊन असल्याने ऍपवर लॉगइनच होत नाही. त्यामुळे महिला वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. एकंदरीतच काय तर या योजनेची फक्त घोषणाच झाली असून खऱ्या अर्थाने त्याची अमलबजावणी कधी होणार? असा प्रश्न महिला विचारत आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - जरांगेंवर ड्रोनद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप, विशेष पथक करणार प्रकरणाची चौकशी

महिलांचं म्हणणं काय? 

सेतू केंद्रावर गेल्यानंतर अनेक कागदपत्र आणण्यास सांगितली. डोमासाईल, उत्पन्नाचा दाखला आणालया सांगितली. तीन दिवसात ही कागदपत्र जमा केली. ती देण्यासाठी एक महिला नाशिकच्या सेतू केंद्रावर आली होती. तिथे पोहचल्यानंतर तिचा अर्ज घेण्यात आला नाही. वेब पोर्टल बंद असल्याचे तिला सांगण्यात आले. अर्ज करण्यासाठी गेल्यास तिथे काहीना काही बंद असतं. अर्ज मोबाईलवर करा असे तिथले कर्मचारी सांगतात. कर्मचारी टेबलवर बसून राहतात आणि आम्हाला फेऱ्या मारायला लावतात असा आक्षेप काही महिलांनी नोंदवला आहे. उत्पन्नाचा दाखल घेण्यासाठी 200 रूपये लागल्याचेही त्यांनी सांगितले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वसंत मोरेंचं ठरलं! इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले,आता हाती मशाल घेणार

बहीणीची फरफट 

सेतू केंद्रावर एक विधवा महिला आली होती. ती  सिक्युरिटीचे काम करते. अर्ज करताना भरपूर अडचणी येत असल्याचे तिने सांगितले. शिवाय दिवसाची 150 रूपये मजूरी बुडणार ती वेगळीच. अशा वेळी वेळेवर काम झाले पाहीजे अशी त्यांची अपेक्षा होती. रेशन कार्डच्या क्रमांकासाठी आपल्याकडे पंधाराशे रूपये मागितले गेले असे ती सांगते. उत्पन्नाचा दाखला लागेल बोनाफाईड लागेल असं सांगितले जाते. दोन दिवस इकडे फोऱ्या मारत आहोत. आज तर खिडकी बंद आहे. आता सांगत आहेत उद्या या, आज काम होणार नाही. असा आरोप महिला करत आहेत. शिवाय जी माहिती सेतू कार्यालयातून मिळायला हवी ती निट मिळत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. चुकीचे फॉर्म भरले जातात. चुकीचे पेपर मागितले जातात. असा आरोपही केला जात आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!

जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे काय? 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बाबत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महत्वाचं स्पष्टीकरण दिलं असून
योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही. तसेच योजनेचा लाभ घेतांना बँक खात्यात डिपॉझिटही करावे लागणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच या योजनेबाबत अफवा पसरवणारे तसेच कुठे पैसे घेतांना एजंट आढळून आल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रत्येक सेतू केंद्रावर महिलांच्या मदतीसाठी शासकीय अधिकारी नेमण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.