पुण्यात झिकाची रूग्णसंख्या वाढली, एका खासगी रुग्णालयाला पालिकेकडून नोटीस

Zika patients increased in Pune : पुणे शहरात आतापर्यंत एकूण तीन झिकाचे रूग्ण आढळून आल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यातील एरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे (Zika virus) दोन रुग्ण आढळले आहेत. 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या 15 वर्षीय मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता त्यात आणखी एका रूग्णाची भर पडली आहे. पुणे शहरात झिका व्हायरसचे एकूण तीन रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे झिकाची लागण झालेल्या रूग्णाची माहिती रूग्णालयाकडून महापालिकेला कळवण्यात आलं नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने नोबेल रूग्णालयाला नोटीस पाठवली आहे.

नोबेल रूग्णालयात एका नव्या रुग्णाला झिकाची लागण झाली आहे. त्यानुसार पुणे शहरात आतापर्यंत एकूण तीन झिकाचे रूग्ण आढळून आल्याचं समोर आलं आहे. एरंडवणे भागात दोन आणि एक हडपसर भागात झिकाचा रुग्ण आढळून आला आहे. एरंडवणे भागातील डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाची लागण झाली होती. त्यातील एका मुलीला एक जूनला झिकाची लागण झाली होती. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - सावधान! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, डॉक्टरसह मुलीलाही संसर्ग

झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत? 

- एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.

- झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे तीन -14 मध्ये निदर्शनास येतात. 

- झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. 

- ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात.