Team India ODI And T20 Squad : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने रंगणार आहेत. या टूर्नामेंटसाठी आज शनिवारी 4 ऑक्टोबरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केलीय. टेस्ट क्रिकेटनंतर शुबमन गिलच्या खांद्यावर वनडे कॅप्टन्सीचीही जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारतीय संघ निवडण्यासाठी अहमदाबादमध्ये निवडकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत टीम इंडियाचा कर्णधार म्हणून शुबमन गिल, तर उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली.
रोहित शर्माच्या जागेवर शुबमन गिलला वनडेचा कॅप्टन करण्यात आला आहे.वनडे सीरिजसाठी निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तसच वनडे टीममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला आहे. दोघांनाही स्पेशलिस्ट बॅटर म्हणून टीममध्ये सामील केलं आहे. तर टीम इंडियाच्या टी-20 फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादवच राहणार आहे. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्यांचा टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये संधी मिळाली नाहीय.
नक्की वाचा >> Video:मैदानात फक्त रवींद्र जडेजाचीच हवा! धोनीचा रेकॉर्ड मोडताच तलवारीसारखी बॅट फिरवली, सर्व खेळाडू बघतच राहिले
भारताची 15 सदस्यीय वनडे टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कॅप्टन),अक्षर पटेल,केएल राहुल (विकेटकीपर),नीतीश कुमार रेड्डी,वॉशिंगटन सुंदर,कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज,अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा,ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि यशस्वी जैस्वाल.
भारताची 16 सदस्यीय टी-20 टीम : सूर्यकुमार यादव (कॅप्टन),अभिषेक शर्मा,शुबमन गिल (उप-कॅप्टन),तिलक वर्मा, नीतीश कुमार रेड्डी,शिवम दुबे,अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर),वरुण चक्रवर्ती,जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंग, कुलदीप यादव,हर्षित राणा,संजू सॅमसन (विकेटकीपर),रिंकू सिंग,वॉशिंग्टन सुंदर.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा फुल शेड्युल
- 19 ऑक्टोबर : पहिला वनडे सामना, पर्थ
- 23 ऑक्टोबर : दुसरा वनडे सामना, एडिलेट
- 25 ऑक्टोबर : तिसरा वनडे सामना, सिडनी
- 29 ऑक्टोबर : पहिला टी-20 सामना, कॅनबरा
- 31 ऑक्टोबर : दुसरा टी-20 सामना, मेलबर्न
- 2 नोव्हेंबर : तीसरा टी-20 सामना, होबार्ट
- 6 नोव्हेंबर : चौथा टी-20 सामना, गोल्ड कोस्ट
- 8 नोव्हेंबर : पाचवा टी-20 सामना, ब्रिस्बेन