India Squad For West Indies Test Series : एकीकडे आशिया कपच्या सामन्यांचा थरार रंगला असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतीच मोठी घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये भारत-वेस्टइंडिज यांच्यात होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआयने टीम इंडियात मोठे फेरबदल केल्याचं समोर आलं आहे. या टेस्ट सीरिजसाठी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.तर आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा डावखुरा फलंदाज देवदत्त पड्डीकलचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. परंतु, इंग्लंड दौऱ्यात धावांचा सूर न गवसलेल्या करुण नायरला डच्चू देण्यात आलाय. 2 ऑक्टोबरला भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. तर दुसरा सामना राजधानी दिल्लीत अरुण जेटली स्टेडियममध्ये 10 ऑक्टोबरला रंगणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात करुण नायरने खूप चांगली कामगिरी केली नव्हती. त्यामुळे करुण नायरला वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये संधी मिळणार नाही, अशी चर्चा क्रिकेट विश्वात रंगली होती. पण भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना अक्षर पटेलला टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. तर दुसरीकडे देवदत्त पड्डीकलचीही पुन्हा एकदा संघात एन्ट्री झाली आहे.वेस्टइंडिज विरोधात होणारी सीरिज खेळणार असल्याचं जसप्रीत बुमराहने म्हटलं होतं.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असताना बुमराहने फक्त 3 टेस्ट सामने खेळले होते. वेस्टइंडिज विरोधात होणाऱ्या दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघात मोठे बदल होतील, अशी शक्यता नव्हती. विकेटकिपर ऋषभ पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. मॅनचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या टेस्ट सामन्यात ऋषभचा पाय फ्रॅक्चर झाला होता.त्यामुळे ऋषभ पंतचा वेस्टइंडिज सीरिजसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही.त्याच्या जागेवर पहिला पर्याय म्हणून ध्रुव जुरेल मैदानात उतरणार आहे. तर तामिळनाडूचा एन जगदीश बॅकअप प्लेअर असणार आहे.
वेस्टइंडिज सीरिजसाठी 15 सदस्यीय भारतीय टीम : शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीशन (विकेटकीपर),मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.