मॅरियट बोनव्हाय (Marriott Bonvoy) या जागतिक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने आयसीसी (ICC) सोबतच्या आपल्या भागीदारीतून क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आगामी आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी मॅरियट बोनव्हाय सदस्यांना ५०० हून अधिक खास अनुभव (Moments) आणि 'गोल्डन तिकीट' जिंकण्याची संधी मिळणार आहे. मॅरियट बोनव्हाय सदस्यांना त्यांच्या पॉइंट्सचा वापर करून टी २० वर्ल्ड कप २०२६ चे ५०० हून अधिक खास अनुभव घेता येतील. यात फायनलचे 'गोल्डन तिकीट' आणि भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
मॅरियट इंटरनॅशनलच्या 'मॅरियट बोनव्हाय' प्लॅटफॉर्मने फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपसाठी सदस्यांसाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. आयसीसीसोबतच्या जागतिक सहयोगाचा भाग म्हणून, सदस्यांना ५०० हून अधिक डिझाइन केलेले 'मॅरियट बोनव्हाय मोमेंट्स' उपलब्ध करून दिले आहेत.
नक्की वाचा >> Padma Awards : रोहित शर्मा,हरमनप्रीतला पद्मश्री..आणखी कोणा कोणाला मिळालं पद्म पुरस्कार? वाचा दिग्गजांची नावे
'गोल्डन तिकीट' - फायनल पाहण्याची सुवर्णसंधी
- दोन भाग्यवान सदस्यांना मॅरियट बोनव्हाय गोल्डन तिकीट मिळेल, ज्याद्वारे त्यांना टी२० वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना अत्यंत शाही थाटात पाहता येईल:
- पहिले तिकीट: सर्वाधिक पॉइंट्सची बोली (Bidding) लावणाऱ्या सदस्याला मिळेल.
- दुसरे तिकीट: जागतिक 'स्वीपस्टेक'च्या (Sweepstake) विजेत्याला दिले जाईल.
- कसे सहभागी व्हावे? जे सदस्य नाहीत, ते मोफत नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
- ५००+ मॅरियट बोनव्हाय मोमेंट्समध्ये काय आहे खास?
- सदस्य त्यांचे पॉइंट्स वापरून खालील अनुभवांसाठी बोली लावू शकतात किंवा ते रिडीम करू शकतात:
- मॅचडे हॉस्पिटॅलिटी: स्टेडिअममध्ये प्रीमिअम आदरातिथ्याचा अनुभव.
- बियॉन्ड द बाउंड्री: सामन्यापूर्वी मैदानाच्या जवळून पडद्यामागच्या घडामोडी पाहण्याची संधी.
- अँथेम किड्स: तुमच्या पाल्यांना राष्ट्रगीताच्या वेळी खेळाडूंसोबत मैदानात जाण्याची संधी.
नक्की वाचा >> Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीची तारीख ठरली, शहरात बसणार 13 वा महापौर, 2 नावे आहेत आघाडीवर
विशेष आकर्षण: १-पॉइंट ड्रॉप्स (भारत vs पाकिस्तान)
सर्वात जास्त प्रतीक्षा असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी मॅरियट बोनव्हायने '१-पॉइंट ड्रॉप' (1-Point Drops) ही संकल्पना आणली आहे.
केवळ १ पॉइंट रिडीम करून तुम्ही या हाय-व्होल्टेज सामन्याची २ तिकिटे मिळवू शकता. अशा एकूण १० जोड्या उपलब्ध असतील. "मॅरियट बोनव्हाय व्यक्तींना त्यांच्या आवडीच्या गोष्टींच्या जवळ नेते. आम्ही आयसीसीसोबतच्या या सहयोगातून चाहत्यांना केवळ सामनेच नाही, तर आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी देण्यास सज्ज आहोत," असे जॉन टूमी यांनी म्हटले आहे.