Complaint against Hardik Pandya : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी, ८ मार्च रोजी टीम इंडियाने न्यूझीलँडचा 96 रनने पराभव करत T20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद आपल्या नावावर केले. भारतासाठी हा मोठा विजय होता. देशभरात चाहत्यांनी मोठ्या उत्साहात टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला. विजयी खेळीनंतर खेळाडूंनी मैदानावरच सेलिब्रेशन सुरू केलं. (Hardik Pandya Insults the National Flag?)
यावेळी खेळाडूंचे नातेवाईकही मैदानात उतरले. मैदानात खेळाडूंचे फोटोसेशन सुरू होते. यादरम्यान हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड Mahieka ने मैदानातच पांड्याला किस केलं. इतकच नाही तर मैदानातच दोघे रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले.
मैदानातील 'ते' कृत्य भोवणार?
India Vs New Zealand या T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर संपूर्ण देश आनंद साजरा करीत होता. सर्वांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पांड्या इतका खूश दिसत होता की, तो गर्लफ्रेंड Mahieka सोबत रोमँटिक झाला. यावेळी हार्दिक पांड्या याने अंगावर राष्ट्रध्वज ओढून घेतला होता. या कृत्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी पुण्याचे वकील वाजेद खान यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हार्दिक पांड्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाजेद खान यांनी दिलेल्या दिलेल्या अर्जानुसार, नुकतच टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि मैदानावर हार्दिक पांड्या याने तिरंगा परिधान करुन कोपऱ्यात झोपून अश्लील चाळे केले. यावेळी त्याने भारतीय ध्वज गुंडाललेला होता. त्याने केलेली ही कृती राष्ट्रीय गौरव अवमान अधिनियम १९७१ चे कलम २ आणि पूर्वीचे आयपीसी कलम २ आणि ३ या कायद्यानुसार, गुन्हा असून त्याच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. पुढे वाजेद खान यांनी म्हटलं आहे, तिरंग्याचा मान राखणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याविरोधात कायदेशीर कारवाई करून मला न्याय देण्यात यावा.