जाहिरात

Harsha Bhogle : 'जेवायला बोलावून दारातच...; इंडिगो एअरलाइन्सवर पुन्हा का भडकले हर्षा भोगले? प्रवाशांचाही संताप!

क्रिकेट समालोचक आणि लेखक हर्षा भोगले यांनी पुन्हा एकदा इंडिगो एअरलाइन्सवर टीका केली आहे.

Harsha Bhogle : 'जेवायला बोलावून दारातच...; इंडिगो एअरलाइन्सवर पुन्हा का भडकले हर्षा भोगले? प्रवाशांचाही संताप!

Harsha Bhogle on Indigo Airlines : क्रिकेट समालोचक आणि लेखक हर्षा भोगले यांनी पुन्हा एकदा इंडिगो एअरलाइन्सवर टीका केली आहे. हर्षा भोगले यांनी एक ट्विट करीत आपला संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीही हर्षा भोगले यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा इंडिगो एअरलाइन्सवर त्यांनी संताप व्यक़्त केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यासाठी हर्षा भोगले यांनी उपहासात्मक ट्विट केलं आहे. यामध्ये तचे म्हणतात, एके दिवशी मी IndiGo6E च्या लोकांना घरी जेवायला आमंत्रित करणार आहे. आणि जेवण तयार होईपर्यंत आणि टेबलावर जेवण ठेवेपर्यंत त्यांना दारातच उभं करणार आहे. 

यावेळी त्यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या असभ्य वर्तन आणि व्यवस्थापनातील अपरिपक्वपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. हर्षा भोगलेंनी इंडिगो एअरलाइन्सवर ट्विट केल्यानंतर अनेकांनी आपल्या व्यथा मांडला. इंडिगो एअरलाइन्सबद्दल अनेकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. मात्र एअरलाइन्सकडून ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे हर्षा भोगलेंच्या ट्विटवर हजारोंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

European T20 Premier League: अभिषेक बच्चन युरोपीयन टी-20 लीगसाठी सज्ज; 15 जुलैपासून 6 टीम भिडणार

नक्की वाचा - European T20 Premier League: अभिषेक बच्चन युरोपीयन टी-20 लीगसाठी सज्ज; 15 जुलैपासून 6 टीम भिडणार

दरम्यान हर्षा भोगले यांनी वरील ट्विट कोणत्या घटनेवर लिहिलं हे नमूद केलेलं नाही. मात्र नेटिझन्सने मात्र यावर प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे. सर्वात स्वस्त एअरलाइन्स म्हणून इंडिगोचं नाव घेतलं जात असलं तरी व्यवस्थापनेतील गोंधळामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

हर्षा भोगलेंचं जुनं ट्विट..
यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये हर्षा भोगले यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला होता. एका वृद्ध दाम्पत्याने अधिक पैसे भरून चौथी सीट बुक केली होती. मात्र आयत्या वेळी कोणतीही माहिती न देता त्यांना 19 व्या सीटवर पाठवण्यात आलं. त्यामुळे या दाम्पत्याला चिंचोळ्या जागेतून चालत लांबपर्यंत जावं लागलं आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता, हे प्रकरण अधोरेखित करीत हर्षा भोगले यांनी इंडिगो एअरलाइन्सवर टीका केली होती.