जाहिरात

European T20 Premier League: अभिषेक बच्चन युरोपीयन टी-20 लीगसाठी सज्ज; 15 जुलैपासून 6 टीम भिडणार

European T20 Premier League: लीगचा पहिला हंगाम डब्लिन आणि रॉटरडॅम येथे होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा या लीगचा सह-संस्थापक आहे.

European T20 Premier League: अभिषेक बच्चन युरोपीयन टी-20 लीगसाठी सज्ज; 15 जुलैपासून 6 टीम भिडणार

युरोपियन टी-20 प्रीमियर लीग (ETPL) 15 जुलैपासून सुरू होत आहे. 3 ऑगस्टपर्यंत लीगचे सामने खेळले जातील. यामध्ये 3 देशांतील 6 संघ सहभागी होतील. लीगमध्ये एकूण 33 सामने खेळवले जातील. लीगचा पहिला हंगाम डब्लिन आणि रॉटरडॅम येथे होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा या लीगचा सह-संस्थापक आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिषेक बच्चनचे डब्लिनमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ETPL ही ICC ने मंजुरी दिलेली T20 फ्रँचायझी लीग आहे. ईटीपीएलमध्ये अनेक क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधील जागतिक दर्जाचे खेळाडू सहभागी होतील. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-20 कॅलेंडरमध्ये जागतिक दर्जाची स्पर्धा म्हणून त्यांचा दर्जा आणखी मजबूत होईल.

अभिषेक बच्चनने आयर्लंडच्या प्रतिष्ठित सेंट पॅट्रिक डे सेलिब्रेशनचा पुरेपूर आनंद घेतला. जिथे त्याला स्थानिक चाहत्यांकडून आणि अनिवासी भारतीयांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी डब्लिनमधील भारतीय दूतावासालाही भेट दिली. जिथे त्यांचे स्वागत आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांनी केले. अभिषेक बच्चन, ईटीपीएलचे सह-मालक प्रियांका कौल आणि सौरव बॅनर्जी यांना क्रिकेट आयर्लंडचे सीईओ वॉरेन ड्युट्रोम आणि आयर्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू केविन ओ'ब्रायन यांनी  सन्मानित केले.

ट्रेंडिंग बातमी - Narayan Rane: नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे 2 फोन, चर्चा काय झाली? राणेंनी सविस्तर सांगितलं

अभिषेक बच्चन, सहकारी ETPL सह-मालक प्रियंका कौल आणि सौरव बॅनर्जी यांच्यासह, क्रिकेट आयर्लंडचे सीईओ वॉरेन ड्युट्रोम आणि आयरिश क्रिकेट लिजेंड केविन ओ'ब्रायन यांनी पारंपारिक शेमरॉक सादरीकरणाने सन्मानित केले. हे जेश्चर जागतिक स्तरावर सांस्कृतिक आणि क्रीडा देवाणघेवाण वाढवण्याच्या लीगच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. केविन ओब्रायनच्या सहभागाने लीग आणि आयर्लंडचा समृद्ध क्रिकेट वारसा यांच्यातील खोल संबंध अधोरेखित केला.

अभिषेक बच्चनने यावेळी म्हटलं की, "डब्लिनला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. येथील लोकांकडून मिळणारं प्रेम आणि आदरातिथ्य वारंवार येण्यास उत्सुक करणारं आहे. युरोपियन T20 प्रीमियर लीगने माझ्या आणि आयर्लंडमध्ये एक विशेष नातं निर्माण केलं आहे. क्रिकेटच्या जगामध्ये बदल घडवून आणणारी ही लीग आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: