जाहिरात

Rinku Singh Wedding: ठरलं! रिंकू सिंग- खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीख फिक्स! 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात

Rinku Singh  Wedding: ठरलं! रिंकू सिंग- खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीख फिक्स! 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात

Rinku Singh Priya Saroj Wedding: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग आणि सपा खासदार प्रिया सरोज यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरुू आहेत. याचबाबत आता एक महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा अन् लग्नसोहळ्याची तारीखही फिक्स करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, आता 8 जून रोजी रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न होणार आहेअंगठी समारंभाचा कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एका सात तारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये ते लग्नगाठ बांधणार आहेत. 

रिंकू सिंग भावी पत्नी प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर मतदारसंघातून खासदार आहेत. 2024च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाच्या बीपी सरोज यांचा 35850 मतांनी पराभव करून मोठा विजय मिळवला. प्रिया सरोजच्या वडिलांचे नाव तूफानी सरोज आहे, ते मछलीशहर मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. सध्या ते केरकत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

रोहित शर्माच्या विकेटनंतर सेलिब्रेशन का केलं नाही? मोहम्मद सिराजचं उत्तर वाचून वाटेन अभिमान!

रिंकू सिंग  हा टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. तर प्रिया सरोज या राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांच्या लग्नात देशातील स्टार क्रिकेटपटू, राजकारणी, सिनेविश्वातील तारे आणि उद्योगपतींची हजेरी पाहायला मिळणार आहे. 

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची भेट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात.मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियाच्या एका मैत्रिणीला जिचे वडील क्रिकेटपटू होते ते रिंकूला चांगले ओळखतात. त्यांनीच पहिल्यांदा रिंकू आणि प्रियाची ओळख करून दिली. असेही म्हटले जाते की अलिगडमध्ये बांधलेले रिंकूचे नवीन घर प्रियाने फायनल केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com