
गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj ) आयपीएल 2025 मधील त्याच्या दुसऱ्या मॅचनंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) आऊट केल्यानंतर सेलिब्रेशन का केलं नाही? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आयपीएल 2025 मधील नवव्या मॅचमध्ये सिराजची सुरुवात खराब झाली. रोहितनं त्याला सुरुवातीला फोर लगावला. पण, नंतर सिराजनं तातडीनं त्वरित एक अचूक इनस्विंगर टाकत रोहितचे स्टंप उडवले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जिओसिनेमाच्या 'जेन बोल्ड' विशेष कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, 'माझा पहिला सामना चांगला गेला नाही. पण, मी त्यातून शिकलो आणि माझ्या बॉलिंगवर लक्ष केंद्रित केले. रोहित भाईविरुद्ध, मी दोनदा चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला, पण ते काम केले नाही. मग मी माझ्या योजनेवर ठाम राहिलो आणि विकेट मिळवली. मला त्याचा खूप आदर आहे, म्हणूनच मी जास्त जल्लोष केला नाही.
( नक्की वाचा : GT vs MI : शुबमन गिल आणि हार्दिक पांड्यातील वाद उघड, मैदानातील 2 घटनांमुळे खळबळ! )
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली नाही त्यावेळी काय वाटलं? या प्रश्नाचं उत्तरही सिराजनं यावेळी दिलं. चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती, पण मी स्वतःला सांगितले की हे अजून संपलेले नाही. आयसीसी स्पर्धा कोणत्याही खेळाडूसाठी खूप महत्त्वाच्या असतात - पण मला माहित होते की मला माझ्या कौशल्यांवर आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल. मला पुन्हा माझ्या गोलंदाजीचा आनंद घ्यावा लागला. आता, मला आत्मविश्वास वाटतोय आणि मी खूप आनंद घेत आहे.
आयपीएल 2025 मधील गुजरात टायटन्सचे आव्हान आता संपुष्टात आले. आयपीएल एलिमेनेटर मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं त्यांचा 20 रन्सनं पराभव केला. सिराजचा गुजरात टायटन्सकडून हा पहिलाच आयपीएल सिझन होता. त्यानं या सिझनमधील 15 मॅचमध्ये 9.24 च्या इकोनॉमी रेटनं 16 विकेट्स घेतल्या. सिराजचं पुढील लक्ष्य हे टीम इंडियाची इंग्लंड विरुद्ध होणारी पाच टेस्ट मॅचची सीरिज आहे. या सीरिजमध्ये अनुभवी मोहम्मद शमीची दुखापतीमुळे निवड झालेली नाही. शमीच्या अनुपस्थितीमध्ये सिराजवर मोठी जबाबदारी असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world