IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक पराभव, चेन्नईचा सलग दुसरा विजय

या सर्वांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईला 192 धावा उभारता आल्या. सुरूवातीला चेन्नई 200 पल्ला ओलांडेल असे वाटत होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
सौजन्य IPL

चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने  कोलकाता नाईट रायडर्स समोर  193 धावांचे लक्ष ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना कोलकाचाची सुरूवात चांगली झाली नाही. फिन अॅनल हा फक्त एक धाव काढून माघारी परतला.  त्यानंतर सुनिल नारायण आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सुनिल नारायण 24 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या अंगकृष्ण रघुवंशी याने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण तो ही मोठी खेळी करू शकला नाही. तो 19 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. कोलकाताची स्थिती 10 ओव्हर्सनंतर 3 बाद 81 अशी झाली होती.  कॅप्टन अजिंक्य रहाणेकडून भरपूर अपेक्षा होती. पण तो ही 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला कॅमेरून ग्रिन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे 12 ओव्हर्सला कोलाकाताची स्थिती 5 बाद 90 अशी झाली होती. रिंकू सिंह पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ 6 रन्स करता आल्या. कोलकाताला 20 ओव्हर्समध्ये 160 धावा करता आल्या. त्यांच्या सात विकेस्ट गेल्या. चेन्नईचा 32 धावांनी विजय झाला. 

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि  कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला. KKR विरुद्ध चेन्नईने  प्रथम फलंदाजी केली.  त्यांनी निर्धारित 20 षटकांत 5 बाद 192 धावां केल्या.  नाणेफेक गमावून मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात काहीशी अडखळत झाली. तरी संजू सॅमसनच्या महत्वपूर्ण खेळीने संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. संजूने 48 धावांची खेळी करत डावाला आकार दिला. त्याला आयुष म्हात्रेची मोलाची साथ लाभली. या शिवाय ब्रेव्हिस याने ही मोलाची खेळी केली. सरफराज खानने ही छोटी पण जलद खेळी करत संघाला मोलाची धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. 

Advertisement

नक्की वाचा - Praful Hinge, Video : एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स, 3 फलंदाज शून्यावर बाद, मराठमोळा प्रफुल हिंगे आहे तरी कोण?

चेन्नईकडून सर्वाधिक 48 धावा संजू सॅमसन ने केल्या. त्याच्या या खेळीत त्याने 3 सिक्स लगावले. त्याला आयुश म्हात्रेची चांगली साथ मिळाली. आयुश 38 धावा केल्या. या सामन्यात ही कर्णधार ऋतुराज गायकवाड अपयशी ठरला. त्याला केवळ सात धावा करता आल्या. ब्रेव्हिसने ही फटकेबाजी करत 29 बॉलमध्ये 41 धावा केल्या. तर सर्फराज खानने 18 चेंडूत 23 धावा काढल्या.  या सर्वांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईला 192 धावा उभारता आल्या. सुरूवातीला चेन्नई 200 पल्ला ओलांडेल असे वाटत होते. पण तसे शक्य झाले नाही. शेवटच्या षटकात शिवम दुबेकडून अपेक्षित असलेली फटकेबाजी होवू शकली नाही. 

नक्की वाचा - IPL 2026: खर्च 118 कोटी आणि परफॉर्मन्स 'झिरो'! आयपीएल 2026 मधील महागड्या खेळाडूंचा असा झालाय 'गेम'

कोलकाताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला टिच्चून मारा केला. विशेषतः कार्तिक त्यागीने भेदक गोलंदाजी करत 2 बळी टिपले. चेन्नईच्या धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. केकेआरने आजच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये एक बदल केला होता. नवदीप सैनीच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली. दुसरीकडे, चेन्नईच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही महेंद्रसिंह धोनी मैदानात न उतरल्याने चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली. कोलकाताकडून कार्तिक त्यागी वगळता एका ही गोलंदाजाला आपली हवी तशी छाप पाडता आली नाही.