Praful Hinge Cricket Stats : राजस्थान रॉयल संघाचे धडाकेबाज फंलंदाज बाद करून सनरायजर्स हैदराबाद संघासाठी विजयश्री खेचून आणणारा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगेची संपूर्ण क्रिडाविश्वात तुफान चर्चा रंगली आहे. आयपीएलच्या मिनी लिलावात प्रफुलला सनरायझर्स हैदराबादने 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. हैदराबादने संघात गोलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी प्रफुलचा समावेश केला. आज हैदराबादमध्ये राजी गांधी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात प्रफुलने भेदक गोलंदाजी करून राजस्थानच्या संघाची दाणादाण उडवली. प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीला भोपळाही फोडू दिला नाही. त्याने वैभवला शून्यावर बाद केलं. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि प्रेटोरियसला शून्यावर बाद केलं. तसच कर्णधार रियान परागलाही चार धावांवर बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.अशातच प्रफुलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. जाणून घेऊयात प्रफुल हिंगेच्या क्रिकेट करिअरबाबत सविस्तर माहिती.
कोण आहे हैदराबादचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे?
नागपूरचा 24 वर्षांचा वेगवान गोलंदाज(Right Hand) प्रफुल हिंगेनं पंजाब किंग्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलचा डेब्यू सामना खेळला. मागील हंगामापासून यावर्षीच्या सुरुवातीला हैदराबाद संघाची गोलंदाजी फारशी चांगली झाली नाही. त्यामुळे एक प्रभावशाली पर्याय म्हणून प्रफुल हिंगेला संघात संधी देण्यात आली. हिंगे उंच हाताच्या अॅक्शनसह आणि भेदक मारा करण्यात तरबेज आहे. तो हवेत तसेच सीमवरून दोन्ही बाजूंनी चेंडू वळवू शकतो.पिचवर वेगवान गोलंदाजी करण्याची त्याच्याकडे कमालीची क्षमता आहे. त्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये तो प्रभावी गोलंदाज ठरत आहे.
नक्की वाचा >> US-Iran War: होर्मुजमध्ये नाकाबंदी,सर्व जहाजे अडकणार,भारतालाही बसणार फटका? ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
Golden Duck for Vaibhav Suryavanshi.
— Johns. (@CricCrazyJohns) April 13, 2026
Two ball Duck for Dhruv Jurel.
Two ball Duck for Lhuan Dre Pretorius.
PRAFUL HINGE - ONE OF THE CRAZIEST DEBUT IN IPL HISTORY 🥹🧡
FIRST BOWLER EVER TO TAKE 3 WICKETS IN THE FIRST OVER OF AN IPL MATCH. pic.twitter.com/P4iVq3uz6o
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी
प्रफुल हिंगेनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 56.1 च्या स्ट्राईक रेट आणि 2.85 च्या इकोनॉमीने 27 विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट A क्रिकेटमध्ये प्रफुलने 60 चा स्ट्राईक रेट आणि 6.06 च्या इकोनॉमीने 5 विकेट्स घेतल्या आहेत.तर टी-20 क्रिकेटमध्ये 24 चा स्ट्राईक रेट आणि 5.75 च्या इकोनॉमीने आतापर्यंत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
नक्की वाचा >> Praful Hinge, RR vs SRH : एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स, 3 फलंदाज शून्यावर बाद, मराठमोळा प्रफुल हिंगे आहे तरी कोण?
आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या वेगवान गोलंदाजांनी फक्त 11 विकेट्स घेतले आहेत. त्यांची सरासरी 32.18 असून, 10.56 इतका इकॉनॉमी रेट आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन पराभव टार्गेट डिफेंड करताना झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world