Abhishek Sharma Viral Video : राजस्थान रॉयल्स विरोधात झालेल्या सामन्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एसआरएचचा संघ हॉटेलमध्ये जात असताना एका महिलेनं (Female Fan)अभिषेकचा हात खेचला. त्यानंतर अभिषेकला मोठा धक्काच बसला. सेक्युरिटी असतानाही अशाप्रकारची घटना घडल्याने अभिषेकसह अनेकांच्या भुवया उंचावल्या.हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की,ही सुरक्षा व्यवस्थेत झालेली मोठी चूक होती.
अखेर कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?
आता त्या मिस्ट्री गर्लबाबत माहिती समोर आली आहे. हिमशिखा त्रिपाठी असं या महिलेचं नाव आहे. या महिलेनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत हिमशिखाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "गर्ल्स तुमचे जिजू प्रेमाने तयार होत नव्हते, त्यामुळे असं काहीसं केलं आहे मी..".हिमशिखा त्रिपाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील महाळुंगे परिसरातील नागरिकांनी अलर्ट राहा,अखेर 'ती' महिला अडकली पोलिसांच्या जाळ्यात
दुसरीकडे अभिषेकरने आयपीएल 2026 चा त्याचं तिसरं अर्धशतक ठोकून जयपूरच्या हाय-स्कोरिंग सामन्यात हैदराबादला राजस्थानविरोधात विजय मिळवून दिला. त्याने 29 चेंडूत 57 धावा केल्या.यामध्ये 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 196 पेक्षा जास्त होता. या इनिंगमध्ये अभिषेकने न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू विलियमसनला मागे टाकलं. हैदराबादसाठी सर्वात जास्त धावा करणारा अभिषेक तिसरा खेळाडू ठरला आहे.
अभिषेक शर्माने केला मोठा विक्रम
आयपीएलचे 82 सामने आणि 79 इनिंगमध्ये अभिषेकने 29.21 च्या सरासरीनं आणि 169.28 च्या स्ट्राईक रेटनं एकूण 2133 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक,2 अर्धशतक आणि 141* सर्वाधिक धावांचा समावेश आहे.अशाप्रकारे त्यांनी विलियमसनच्या विक्रमाला मागे टाकलं आहे. ज्याने 76 सामने आणि 75 इनिंगमध्ये 36.22 च्या सरासरीनं 126 हून जास्त स्ट्राईक रेटने 2101 धावा केल्या होत्या.यामध्ये 18 अर्धशतक आणि 89* सर्वाधिक धावसंख्येचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world