KKR vs GT, IPL 2026 : इडन गार्डनवर फिन एलनचा धमाका, 'या' मेगा रेकॉर्डला गवसणी, अभिषेक-वैभवपुढे तगडं आव्हान

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ 'प्ले ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. किगं खानच्या केकेआर संघात फिन एलन हा आक्रमक फलंदाज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
GT vs KKR, Finn Allen Record

Finn Allen's big record: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ 'प्ले ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. किगं खानच्या केकेआर संघात फिन एलन हा आक्रमक फलंदाज आहे. ज्याने आज शनिवारच्या सामन्यात ईडन गार्डनमध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. एलनने वादळी खेळी करून 35 चेंडूत 93 धावा कुटल्या. या इनिंगमध्ये 10 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. एलनच्या या स्फोटक खेळीने गुजरातच्या गोलंदाजांची पुरती दमछाक उडाली. या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावार फिन एलनने मेगा टूर्नामेंटमध्ये मेगा रेकॉर्डची बरोबरी केली.

स्पेशल क्लबमध्ये सामील झाला फिन

फिन एलनने केकेआर विरोधात दहा षटकार ठोकले. याचसोबत तो आयपीएलमध्ये एका सामन्यात दोन वेळा दहा षटकार मारणार फक्त तिसरा फलंदाज बनला आहे. यामध्ये ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. गेलने हा कारनामा एकदा नाही,तर चार वेळा केला आहे. गेलने एका सामन्यात दहा षटकार मारण्याची कामगिरी चार वेळा केली आहे.फिनने षटकारांचा पाऊस पाडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा दोघांनाही मोठं आव्हान दिलं आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: रांजणगावात शुकशुकाट! पोलिसांच्या पथकावर गोळीबार, आरोपी उसाच्या शेतात पसार,संपूर्ण परिसरात नाकाबंदी

अभिषेक-वैभव केव्हा देणार प्रत्युत्तर?

वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माची बरोबरी आता फिन एलनने केली आहे. याचसोबत भारताचे दोन्ही आक्रमक फलंदाजांना चाहत्यांनी मोठा सवाल केला आहे. हे दोघे पुन्हा कधी एलनच्या पुढे जाणार? फिन एलनने 93 धावांची खेळी करून सिद्ध केलं आहे की, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नवे सिक्सर किंग आहेत. आयपीएलमध्ये सिक्स मारण्याच्या सरासरीत नंबर तीनवर आहे. मुंबईचा रियान रिकल्टनने प्रत्येक इनिंगमध्ये सरासरी 3.70 षटकार ठोकेले आहेत. तर वैभवने 3.60 षटकार मारले आहेत. तसच फिन एलन 3.38 टक्क्यांवर आहे. 

नक्की वाचा >> NEET पेपरफुटीचं लातूर-पुणे कनेक्शन नेमकं काय? पी.व्ही.कुलकर्णी खरा मास्टरमाईंड? वाचा INSIDE STORY

केकेआरच्या इनिंगमध्ये सर्वात जास्त सिक्स ठोकणारे फलंदाज

षटकार  फलंदाज  वर्ष
13  मॅक्युलम   2008
11  आंद्रे रसल     2018
10     फिन एलन    2026
10   फिन एलन  2026

Topics mentioned in this article