जाहिरात

Pune News: रांजणगावात शुकशुकाट! पोलिसांच्या पथकावर गोळीबार, आरोपी उसाच्या शेतात पसार,संपूर्ण परिसरात नाकाबंदी

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात शुक्रवारी रात्री मोठी खळबळ उडाली.शिरूर तालुक्यातील सोने सांगवी गावाजवळ आरोपींचा पाठलाग करत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकावर दोन संशयितांनी गोळीबार केला.

Pune News: रांजणगावात शुकशुकाट! पोलिसांच्या पथकावर गोळीबार, आरोपी उसाच्या शेतात पसार,संपूर्ण परिसरात नाकाबंदी
Ranjangaon Police Firing News Today (Photo-AI)
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी 

Ranjangaon Crime News : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात शुक्रवारी रात्री मोठी खळबळ उडाली.शिरूर तालुक्यातील सोने सांगवी गावाजवळ आरोपींचा पाठलाग करत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकावर दोन संशयितांनी गोळीबार केला.या घटनेनंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर देत हल्लेखोरांवर गोळीबार केला.सुदैवाने या चकमकीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड पोलीस एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी रांजणगाव एमआयडीसी परिसरात आले होते.आरोपींचा माग काढत पोलिसांचे पथक सोने सांगवी परिसरात पोहोचले.यावेळी संशयित आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला.

नक्की वाचा >> NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी आणखी एका मास्टरमाईंडला अटक, पुण्यातील 'ती' शिक्षिका गजाआड

परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार केला. मात्र अंधार आणि ऊसाच्या दाट शेतांचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गोळीबारानंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला.पुणे ग्रामीण पोलिस,रांजणगाव एमआयडीसी पोलीस,शिरूर पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त पथके घटनास्थळी दाखल झाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

नक्की वाचा >>NEET पेपरफुटीचं लातूर-पुणे कनेक्शन नेमकं काय? पी.व्ही.कुलकर्णी खरा मास्टरमाईंड? वाचा INSIDE STORY

पोलिसांनी आरोपींवर गोळीबार का केला?

परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून संशयितांच्या हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.या घटनेमुळे रांजणगाव आणि शिरूर तालुक्यात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान,आरोपी कोणत्या गुन्ह्यात फरार होते,त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली आणि त्यांनी पोलिसांवर गोळीबार का केला? याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com