जाहिरात

रेल्वेच्या धडकेत इंग्लंडच्या माजी कसोटीपटू ग्रॅहम थोर्पेंचा मृत्यू; पत्नी म्हणते, नैराश्येतून घेतला स्वत:चा जीव

इंग्लंडकडून 100 टेस्ट खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये थोर्पेचा समावेश होता.

रेल्वेच्या धडकेत इंग्लंडच्या माजी कसोटीपटू ग्रॅहम थोर्पेंचा मृत्यू; पत्नी म्हणते, नैराश्येतून घेतला स्वत:चा जीव
नवी दिल्ली:

इंग्लंडचा माजी कसोटीपटू ग्रॅहम थोर्प यांचं ( Graham Thorpe) 5 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालं. मृत्यूच्या नऊ दिवसांनी त्यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. रेल्वेखाली थोर्प यांचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तर त्यांनी रेल्वेखाली येत आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगितलं जात आहे. त्यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, थोर्प यांनी नैराश्यातून आत्नहत्या केली. क्रिकेटर ग्रॅहम थॉर्प इंग्लंडचे कोच होते. मात्र कोचपदावरून हटवल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले होते. गेला बराच काळ ते डिप्रेशनशी दोन हात करीत होते. यातच त्यांनी रेल्वेखाली येत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. 

इएसपीएनने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचा एशर रेल्वे स्टेशन येथे ट्रेनने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी थोर्पे यांनी नैराश्यातून स्वत: चा जीव घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

नक्की वाचा - Vinod Kambli : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला...

थोर्पची कारकिर्द

इंग्लंडकडून 100 टेस्ट खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये थोर्पेचा समावेश होता. 1993 ते 2005 या कालावधीमध्ये त्यानं 100 टेस्टमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यानं 16 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरीसह 6744 रन काढले. थोर्प 82 वन-डे खेळला. त्यामध्ये त्यानं 21 हाफ सेंच्युरीसह 2380 रन केले.

इंग्लिश कौंटीमधील दिग्गज खेळाडूंमध्ये ग्रॅहम थोर्पचा समावेश होतो. त्यानं 341 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 49 सेंच्युरींच्या मदतीनं 21937 रन काढले होते. तसंच A श्रेणीच्या क्रिकेटमध्ये 9 सेंच्युरीसह 10871 रन काढले. 

2013 साली तो इंग्लंडच्या वन-डे आणि T20 टीमचा बॅटींग कोच होता. त्याचबरोबर 2020 साली पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये इंग्लंडचा हंगामी कोच म्हणूनही त्यानं काम केलं आहे. थोर्पची 2022 साली अफगाणिस्तानचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी तो गंभीर आजारी पडला. याच आजारपणात त्याचं निधन झाल्याचं दिसून येत आहे. 

Previous Article
धक्कादायक! दिग्गज क्रिकेटपटूनं स्वत:च संपवलं आयुष्य, मृत्यूनंतर 7 दिवसांनी पत्नीचा गौप्यस्फोट
रेल्वेच्या धडकेत इंग्लंडच्या माजी कसोटीपटू ग्रॅहम थोर्पेंचा मृत्यू; पत्नी म्हणते, नैराश्येतून घेतला स्वत:चा जीव
morne-morkel-appointed-as-team-india-mens-bowling-coach
Next Article
गौतम गंभीरची मागणी पूर्ण, 'हा' दिग्गज झाला टीम इंडियाचा बॉलिंग कोच