Funny Memes On Mohammad Rizwan : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान 3 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेचं यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दोन्ही कर्णधारांचा भव्य फोटोशूट आयोजित केला होता. त्यावेळी मालिकेच्या ट्रॉफीचंही अनावरण करण्यात आलं. परंतु, या फोटोशूटची संपूर्ण क्रिकेटविश्वात तुफान चर्चा रंगली आहे. तसच सोशल मीडियावर मिम्सचा वर्षावही होत आहे. यामागचं कारणही खास आहे. फोटोशुटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार आघा सलमान आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श आपापल्या देशांच्या झेंड्यासोबत एका टुक-टुकमध्ये बसलेले दिसतात.पण हे फोटो इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण चाहत्यांनी टुक-टुक चालकाची तुलना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानशी केली आहे. चाहत्यांनी भन्नाट मिम्स शेअर करत रिझवानची खिल्लीच उडवली आहे.
बुधवारी 28 जानेवारीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी झालेल्या कर्णधारांच्या फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले. पण या फोटोशूटमधील एक फ्रेमने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट करत म्हटलं की,अनुभवी विकेटकीपर‑फलंदाज मोहम्मद रिझवानला अखेर राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर तो पुन्हा पाकिस्तानच्या T20I सेटअपमध्ये परतला आहे. हा क्षण त्या टुक‑टुक ड्रायव्हरशी संबंधित होता,जो माजी पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवानसारखा दिसत होता. चाहत्यांनी लगेचच ड्रायव्हर आणि रिझवान यांच्या चेहऱ्यातील साम्य दाखवून दिले आणि या पाकिस्तानी खेळाडूवर मजेशीर जोक्स आणि मीम्स शेअर केले.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death : राज्याचा पुढील अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा
मोहम्मद रिझवानला पाकिस्तान संघातून का वगळण्यात आले?
पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने 2024 च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौर्यात निराशाजनक कामगिरी केली. त्याला राष्ट्रीय T20I संघातून वगळण्यात आले. 2024 च्या आयसीसी टी-20 (ICC T20) विश्वचषक स्पर्धेदरम्यान (वेस्ट इंडिज आणि USA मध्ये झालेल्या) त्याने चार इनिंगमध्ये फक्त 110 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट फक्त 90.9 होता. हा स्ट्राईक रेट सध्याच्या T20 क्रिकेटमध्ये अत्यंत कमी मानला जातो.मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी त्याचा शेवटचा T20I सामना (106 पैकी) डिसेंबर 2024 मध्ये सेंटुरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.हा दिग्गज फलंदाज अजूनही पाकिस्तानच्या टेस्ट आणि ODI संघाचा महत्त्वाचा भाग आहे.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20I मालिका
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन टी-20 सामने होणार आहेत. पीसीबीने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार,मालिकेतील सर्व तीन सामने लाहोरच्या प्रतिष्ठित गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवले जातील. मालिकेचा पहिला सामना शुक्रवार,29 जानेवारी रोजी खेळला जाणार असून, दुसरा आणि तिसरा सामना 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी होईल. मिशेल मार्शला विश्रांती देण्यात आल्यामुळे ट्रॅव्हिस हेड पहिल्या T20I मध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. बाबर आझम आणि शहीन आफ्रिदी हे दोघेही या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील BBL 2025-26 मध्ये खेळून परतल्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करणार आहेत.