जाहिरात

Ajit Pawar Death : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्यसह देशभरात शोककळा पसरली आहे. तसच राजकीय वर्तुळातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणत्या तीन नेत्यांची नावं चर्चेत आहेत? वाचा..

Ajit Pawar Death : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा
Ajit Pawar Death Impact On Maharashtra Budget 2026
मुंबई:

Maharashtra Budget Session 2026 Latest News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांचा काल बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला. आज बारामती येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसागर उसळला होता. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यसह देशभरात शोककळा पसरली आहे. तसच राजकीय वर्तुळातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.अशातच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार? 

येत्या 23 फेब्रुवारी पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या भारतातील आघाडीचे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणे ही सर्वात महत्ताची गोष्ट आहे. अजितदादा सोडले तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया हाताळू शकतील, अशा तीन अनुभवी नेत्यांची नावं चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील, भाजप नेते तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, हे नेते अर्थसंकल्प मांडू शकतात.  

सध्याची राजकीय स्थिती पाहता सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा  मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाईल याबाबत साशंकता आहे.अशातच पुढील अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करतील आणि विधान परिषदेत ही जबाबदारी गेल्या वर्षी प्रमाणे वित्त राज्यमंत्री एडव्होकेट आशिष जयस्वाल पार पाडतील,अशी शक्यता आहे. 

नक्की वाचा >> Ajit Pawar: 'अजित दादा अमर रहे', 'अजित दादा परत या' म्हणते अजित पवारांना अखेरचा निरोप, काटेवाडी गावात शोककळा

"राजकीय दु:खवटा संपल्यावर अधिसूचना काढण्यात येईल"

महाराष्ट्राच्या नव्या अर्थसंकल्पासाठी जेमतेम एक महिन्याचा कालावधी उरलेला आहे.यासाठी अधिकारी वर्गाकडून प्राथमिक काम सुरु झालं आहे.अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः अनुभवी आणि या क्षेत्रात जाणकार असल्याने या परिस्थितीवर महाराष्ट्र शासन सहज मात करेल,असा विश्वास राज्यातील अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. 3 दिवसांचा राजकीय दु:खवटा संपला की, त्यानंतर आवश्यक ती अधिसूचना काढण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आशिष जयस्वाल एनडीटीव्हीशी बोलताना काय म्हणाले?

याविषयावर एनडीटीव्ही मराठीशी बोलताना राज्याचे वित्त राज्यमंत्री एडव्होकेट आशिष जयस्वाल म्हणाले की “आता समोर अधिवेशन आहे. या पाच तारखेपर्यंत आचारसंहिता आहे.सध्या राज्यात काही ठिकाणी सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर म्हणजे साधारण 6 फेब्रुवारी नंतर याविषयी बैठका घेण्याबाबत ठरले होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समिती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे डीपीडीसीच्या बैठका सध्या सुरू आहेत.  जिल्ह्याच्या आराखड्यानुसार कोणत्या विभागाला किती निधी देण्याबाबतीत बैठका होतील, हे पाहावं लागले.विशेष म्हणजे, राज्यासमोरील आर्थिक आव्हाने कमी नाहीत. 

नक्की वाचा >> Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात पायलटची मोठी चूक? शॉकिंग रिपोर्ट समोर; 'धावपट्टी दिसतेय.....'

वर्ष 2025-26 दरम्यान महाराष्ट्राचे एकूण कर्ज 9.32 लाख कोटींवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसच लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भारही आहे. गेल्या वर्षी अजितदादानी त्यांच्या राजकीय करिअरमधील अकरावा अर्थसंकल्प सादर केला होता. अशातच पुढील अर्थसंकल्प जयंत पाटील सादर करतील,अशाही चर्चांना उधाण आलं आहे. मात्र,त्यावेळी ते कोणत्या पक्षाकडून वित्तमंत्री असतील, ते मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरच आधारित असल्याचं बोललं जातंय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com