Sukhoi SJ 100 Aircraft : भारत आणि रशिया आता प्रवासी विमाने तयार करण्याच्या तयारीत आहेत. सरकारी एरोस्पेस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाचे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यात मोठा करार झाला आहे. या करारानुसार भारतात सुखोई सुपरजेट-100 (SJ-100) विमानाची निर्मिती केली जाणार आहे. भारताचा सर्वात मोठ्या सिव्हिल एव्हिएशन शो( Wings India 2026) मध्ये यंदा रशियाचा SBJ-100 (Sukhoi Business Jet-100) विशेष आकर्षण ठरला आहे. सुखोई सुपरजेट कंपनीचा हा बिझनेस आणि व्हिआयपी प्रकारचा जेट पहिल्यांदाच भारतीय विमानवाहतूक बाजारात उपलब्ध होणार आहे.
SBJ-100 म्हणजे काय?
SBJ-100 हा रशियाच्या (Sukhoi Superjet-100) या विमानाचा लक्झरी बिझनेस जेट प्रकार आहे. हा एक सामान्य प्रवासी विमान नसून, आकाशात उडणारं व्हिआयपी ऑफिस आणि कॉन्फरन्स रूमने सज्ज असलेलं हे विमान आहे.
काय आहेत याची प्रमुख वैशिष्ट्ये?
- 15 ते 19 व्हिआयपी प्रवाशांची क्षमता
- मोठे आणि मल्टी-झोन केबिन
- व्हिआयपी लाउंज, मीटिंग क्षेत्र, विश्रांती झोन आणि विशेष वॉशरूम
- लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी उपयुक्त
- आधुनिक एव्हिऑनिक्स आणि हाय-स्पीड क्रूझ क्षमता
नक्की वाचा >> Ajit Pawar Death : राज्याचा पुढील अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा
भारतासाठी हे विमान का महत्त्वाचे?
भारतामध्ये कॉर्पोरेट प्रवास,सरकारी प्रतिनिधिमंडळांची वाहतूक आणि हाय-एंड चार्टर फ्लाइट्सची मागणी सातत्याने वाढत आहे.अशा परिस्थितीत SBJ-100 हे मोठ्या बिझनेस जेटच्या तुलनेत किफायतशीर पर्याय ठरते आणि छोट्या बिझनेस जेट्सपेक्षा खूप अधिक जागा उपलब्ध करून देतं.
HAL सोबत सहकार्याची शक्यता
Wings India 2026 दरम्यान SBJ‑100 संदर्भात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत संभाव्य सहकार्याबाबतही चर्चा सुरू आहे. यात मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल (MRO), तांत्रिक सहाय्य आणि भविष्यातील औद्योगिक सहकार्य यांसारखे घटक समाविष्ट होऊ शकतात. सध्या कोणताही अधिकृत करार जाहीर झालेला नसला तरी हे व्यासपीठ भारत‑रशिया नागरी विमानवाहतूक सहकार्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
SBJ‑100 ची उपस्थिती असा संकेत देतं की, रशिया भारताला फक्त एक बाजारपेठ म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन विमानवाहतूक भागीदार म्हणून पाहत आहे. हे भारतासाठीदेखील एक मोठं व्यासपीठ आहे. ज्याद्वारे देश बिझनेस एव्हिएशनमध्ये आत्मनिर्भर होऊ शकतो आणि नागरी विमान उत्पादन व सपोर्ट इकोसिस्टम अधिक मजबूत करू शकतो.Wings India 2026 मध्ये SBJ‑100 चा समावेश होणे हे भारताच्या बिझनेस आणि VIP एव्हिएशन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जाऊ शकतो. विमान फक्त शो‑स्टॉपर म्हणूनच राहते की खरोखरच भारताच्या आकाशात उड्डाण करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नक्की वाचा >> Ajit Pawar Funeral Live: अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार
सुखोई SJ‑100 ने सर्वांचे लक्ष वेधले
रशियाचे आधुनिक रिजनल जेट विमान सुखोई SJ‑100 भारताच्या विमानवाहतूक क्षेत्रात उतरणार आहे. Wings India 2026 मधील या विमानाचा सहभाग आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबतचे संभाव्य सहकार्य यांनी नागरी उड्डाण तसेच संरक्षण क्षेत्राचे विशेष लक्ष वेधले आहे.
SJ‑100 हे रशियाच्या Sukhoi Superjet परिवारातील नवे आणि सुधारित मॉडेल आहे, जे 70 ते 100 प्रवाशांच्या क्षमतेच्या रीजनल रूट्ससाठी विकसित केले गेले आहे. हे विमान लहान आणि मध्यम अंतराच्या मार्गांवर कार्यान्वित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.
विशेष पद्धतीने केलेले डिझाइन
पुढील दीड वर्षांत जवळपास 10 विमाने भारतात आणली जाऊ शकतात,ज्यामुळे प्रवाशांना या फायदा लवकरच मिळू शकेल. पुढील तीन वर्षांत त्यांच्या विद्यमान सुविधांमध्ये सेमी नॉक-डाउन सुपरजेट 100 (SJ‑100) विमाने तयार करण्यास सुरुवात करणे, हे एचएएलचं लक्ष्य असणार आहे. या श्रेणीतील विमानांसाठी भारताला 200 किंवा त्याहून अधिक विमानांची गरज आहे.SJ‑100 ला प्रादेशिक उड्डाणांसाठी खास तयार करण्यात आले आहे आणि ते रशियातील अनेक एअरलाइन्समध्ये आधीपासूनच सेवा देत आहे. करारानुसार HAL ला विमान आणि त्याचे सुटे भाग तयार करण्याचा परवाना मिळेल,तर रशियन कंपनी तांत्रिक मदत उपलब्ध करून देईल.
भारतासाठी हा करार विशेष का आहे?
भारतामध्ये सध्या 70–100 सीट क्षमतेच्या रीजनल जेट्सच्या श्रेणीत पर्याय खूपच कमी आहेत. SJ‑100 ही रिक्त जागा भरू शकतो. यामुळे UDAN सारख्या योजनांना बळकटी मिळेल. टियर‑2 आणि टियर‑3 शहरांमध्ये अधिक चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.म्हणजेच छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी अधिक प्रभावीपणे जोडले जाईल. तसेच एअरलाइन्स कंपन्यांसाठीही हा एक नवा आणि महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.हे विमान आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.यात नवीन PD‑8 स्वदेशी रशियन इंजिन,आधुनिक ग्लास कॉकपिट आणि जास्त इंधन कार्यक्षमता यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. हा करार मेक इन इंडिया उपक्रमाला आणि प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देईल. सरकार आणि विमानन क्षेत्रासाठी हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world