IPL 2026, GT vs KKR : गिल चमकला! अतितटीच्या सामन्यात गुजरातचा रोमहर्षक विजय, KKR चा सलग 2 सामन्यांमध्ये पराभव

आयपीएलचा 25 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2026, GT vs KKR

Gujrat Titans vs Kolkata Knight Riders : आयपीएलचा 25 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाने 20 षटकांमध्ये सर्वबाद 180 धावा केल्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 

सलामीला उतरलेल्या साई सुदर्शनने 22 धावा केल्या. पण कर्णधार शुबमन गिलने चौफेर फटकेबाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. गिलने 50 चेंडूत 86 धावांची अर्धशतकी खेळी केली. गिलने 4 षटकार आणि 8 चौकारांच्या जोरावर 86 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे गुजरातच्या संघाला कोलकाता विरुद्ध विजय मिळवणं शक्य झालं. गुजरातने पाच विकेट्स गमावून 19.4 षटकात 181 धावा करत या सामन्यात विजय मिळवला.

Advertisement

कोलकाता, गुजरात संघासाठी कोणी किती धावा केल्या?

गुजरात टायटन्ससाठी साई सुदर्शनने 22,कर्णधार शुबमन गिल 86, जॉस बटलरने 25, वॉश्गिंटन सुंदर फक्त 13 धावांवर बाद झाला. ग्लेन फिलिप्सने 19 धावा केल्या. कोलकाताचे सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले. टीम सायफर्टने 14 तर कर्णधार अजिक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यानंतर रघुवंशीही फक्त 8 धावा करून तंबूत परतला. परंतु, कॅमरून ग्रीनने मात्र मैदानात धावांचा पाऊस पाडला. 

नक्की वाचा >> Dhule News: वृद्धाची एन्ट्री, हात हवेत, एकटीच चालत गेली! 18 वर्षाच्या तरुणीच्या अपहरणाचं चक्रावून टाकणारं CCTV

ग्रीनने 55 चेंडूत 79 धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली.यामध्ये 4 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे.तर रोमन पॉवेलने सर्वाधिक 27 धावा केल्या.गुजरातसाठी मोहम्मद सिराजने 2,कगिसो रबाडाने 3,प्रसिद्ध कृष्णा 1,अशोक शर्मा 2 आणि राशिद खानने एक विकेट घेतली. तर कोलकातासाठी सुनील नरेनने एक तर वरुण चक्रवर्तीने दोन विकेट्स घेतल्या. वैभव अरोरालाही एका विकेटवर समाधान मानावं लागलं. रमनदीप सिंगलाही एक विकेट मिळाली.