नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Crime News : धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संजीवनी राहुल वराडे असं या तरुणीचं नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत मुलीची हालचाल पाहून सर्वांना धक्का बसला आहे. धुळे जिल्ह्यात सध्या महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु, धुळे शहरातील संजीवनीच्या बाबतीत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.
सीसीटीव्हीमध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते. त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसतो.तो व्यक्ती गेल्यानंतर संजीवनी अचानक चालू लागते.चालताना तिचा एक हात हवेत असा आहे,जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत ती मुलगी गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासते.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट करणारी बातमी! सिंहगड किल्ल्यावर घडली हादरंवून टाकणारी घटना
शासकीय दूध डेअरी परिसरात भीतीचे वातावरण
या प्रकारामुळे शासकीय दूध डेअरी परिसरात भीतीचे वातावरण आहे.काही प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते,हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकते.मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक एखाद्या प्रभावाने नेल्याची चर्चा नागरिक करत आहेत.दुसरीकडे,ती मुलगी एखाद्या खोल विचारात असावी व त्या तंद्रीतच घराबाहेर पडली असावी,असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
— Naresh Shende (@NareshShen87640) April 17, 2026
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण-मुरबाड आणि कल्याण-भिवंडी मार्गावर RTO ची विशेष मोहीम, 'त्या' 12 टॅक्सींवर केली कारवाई
संजीवनीचे कुटुंबिय आणि नातेवाईक तिचा सर्वत्र शोध घेत आहेत.लक्ष्मीवाडी परिसरासह शहराच्या इतर भागांतही शोध घेऊनही तिचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.दिवसाढवळ्या घडलेल्या या अजब घटनेने सारेच चक्रावले आहेत.दरम्यान,संजीवनी हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने कुटुंबाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world