Harmanpreet Kaur And Jemimah Rodrigues Viral Video : आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर जेतेपदाचं नाव कोरलं. भारत वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवरही जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वर्ष 1973 पासून भारतीय महिला संघाला पहिल्या वर्ल्डकप ट्रॉफीची प्रतिक्षा होती आणि हरमनच्या नेतृत्त्वातील संघामुळे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. रविवारी 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या फायनलच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात विजयाचा एकच जल्लोष सुरु झाला. अशातच कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जचा वडिलांना मिठी मारलेला भावनिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हरमनप्रीत वडिलांना समोर पाहताच खूप भावनिक झाली आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. तसच जेमिमानेही तिच्या वडिलांना मिठी मारून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संघाचे कोच अमोल मुजुमदारही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करून 50 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 299 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 246 धावांवर सर्वबाद केलं आणि फायनलच्या सामन्यात विजयाची मोहोर उमटवली. वर्ल्डकपचा किताब जिंकल्यानंतर भारतीय संघातील सर्व महिला खेळाडूंनी कुटुंबीयांची भेट घेत विजयी जल्लोष साजरा केला.
इथे पाहा हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्जचा व्हायरल व्हिडीओ
Harmanpreet Kaur and her father after the World Cup victory. 🥺❤️ pic.twitter.com/6s5YWh3yer
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2025
नक्की वाचा >> 30 वेळा रेप, 7 पुरुषांचा खून केला..जगातील सर्वात खतरनाक 'Serial Killer' ची स्टोरी OTT वर झळकणार, कुठे पाहाल?
हा किताब भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा होता,हे खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांपेक्षा अधिक चांगले कोणीही समजू शकत नाही.जे प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.किताब जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू खूपच भावूक दिसले.हरमनप्रीत असो,जेमिमा असो की मंधाना..सर्वच खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले.याच दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, जेव्हा हरमनप्रीत तिचे वडील हरमंदर सिंह भुल्लर यांच्याजवळ पोहोचली. तेव्हा ती खूप भावनिक झाली होती.
नक्की वाचा >> Viral News : OLA बाईकचं पेट्रोल संपलं! महिला ड्रायव्हरसोबत पंपापर्यंत 1KM चालली, रात्री घरी पोहोचताच आईसमोर रडली अन्..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world