जाहिरात

30 वेळा रेप, 7 पुरुषांचा खून केला..जगातील सर्वात खतरनाक 'Serial Killer' ची स्टोरी OTT वर झळकणार, कुठे पाहाल?

Who Was Serial Killer Aileen Wuornos : जेव्हा सीरिएल किलर असे शब्द ऐकायला मिळतात,तेव्हा नेहमीच असं वाटतं की कोणत्यातरी पुरुष व्यक्तीने हे मोठं हत्याकांड केलं असेल.पण तुम्हाला माहितीय का?

30 वेळा रेप, 7 पुरुषांचा खून केला..जगातील सर्वात खतरनाक 'Serial Killer' ची स्टोरी OTT वर झळकणार, कुठे पाहाल?
Best Crime Thriller On Netflix
मुंबई:

Who Was Serial Killer Aileen Wuornos : जेव्हा सीरिएल किलर असे शब्द ऐकायला मिळतात,तेव्हा नेहमीच असं वाटतं की कोणत्यातरी पुरुष व्यक्तीने हे मोठं हत्याकांड केलं असेल.पण तुम्हाला माहितीय का? जगातील कुख्यात महिला सीरिएल किलरपैकी एकीने तिचं जीवन दु:ख, शोषण आणि वेदनादायी प्रवासातून सुरु केलं होतं. जिथे मानवतेला कोणतीच जागा उरली नव्हती? ही स्टोरी आहे एलीन वुर्नोसची..जिला मीडियाने क्वीन ऑफ द सीरियल किलर्स असं म्हटलं होतं. या सीरियल किलर्सवर फक्त सिनेमाच बनला नाही,तर ती महिला जगभरात लोकप्रियही झाली. अशातच नेटफ्लिक्सवर नुकतीच एक डॉक्युमेन्ट्री आली आहे. 

एलीन वुर्नोसचा जन्म 1956 मध्ये मिशिगन (अमेरिका) मध्ये झाला होता. बालपणापासूनच तिचं आयुष्य संघर्षमय राहिलं.पिता एक मानसिक रुग्ण आणि गुन्हेगार होता. आईनं लहानपणीचं सोडून दिलं होतं. 13 वर्षांपर्यंत तिच्यावर लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. खुद्द एलिनने म्हटलं की, 30 वेळा अत्याचार झाल्यानंतर मानवतेवरून तिचा विश्वास उडाला.

नक्की वाचा >  Shocking Accident : तनुषा,साई प्रिया आणि नंदिनी..भीषण अपघातात 3 सख्ख्या बहि‍णींचा झाला मृत्यू!

त्या 7 पुरषांची केली होती हत्या..

कमी वयातच एलीन वुर्नोसने वेश्याव्यवसाय सुरु केला होता. याचदरम्यान,1989 ते 1990 दरम्यान तिने फ्लोरिडा हायवेवर 7 पुरुषांची हत्या केली. तिने म्हटलंय की, हे सर्व पुरुष लैंगिक शोषण करण्याची धमकी द्यायचे. मी स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांना मारलं. ते माझ्यावर अत्याचार करणार होते. पण तपास पथकांनी तिला सीरियल मर्डर कसं ठरवलं..एलीन वुर्नोसला 1991 मध्ये अटक करण्यात आली आणि 2002 मध्ये लेथल इंजेक्शनने तिचा मृत्यू झाला.

एलीनच्या जीवनावर बनवला तो सिनेमा

एलीन वुर्नोसच्या जीवनावर आधारित मॉन्स्टर सिनेमा 2003 मध्ये बनवण्यात आला होता. ज्यामध्ये चार्लीज थेरॉनने एलीन वुर्नोसची भूमिका साकारली आणि ऑस्कर जिंकलं. एलीन वुर्नोसच्या जीवनावर नेटफ्लिक्सवर एलीन-क्वीन ऑफ दर सीरियल किलर्स नावाने डॉक्युमेंटरी बनवण्यात आली आहे. यामध्ये एलीनचं जीवन खूप जवळून समजण्याची संधी मिळू शकते. 

नक्की वाचा >> Viral News : OLA बाईकचं पेट्रोल संपलं! महिला ड्रायव्हरसोबत पंपापर्यंत 1KM चालली, रात्री घरी पोहोचताच आईसमोर रडली अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com