NDTV Exclusive : सूर्याला कोणी बनवलं नंबर 1 कॅप्टन? मुलाखतीत सूर्यकुमारने सगळंच सांगितलं, "तो एकमेव खेळाडू.."

Suryakumar Yadav Latest Interview :  भारतीय क्रिकेट संघाने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Suryakumar Yadav Latest Interview
मुंबई:

Suryakumar Yadav Latest Interview :  भारतीय क्रिकेट संघाने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने आशिया कपवर नवव्यांदा जेतेपदाचं नावं कोरलं. भारताचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज तिलक वर्मा आशिय कपच्या फायनलच्या सामन्यात चॅम्पियन ठरला. तिलकने 53 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. त्यामुळे तिलकला प्लेअर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं.तर अभिषेक शर्मा प्येअर ऑफ दर सीरिजचा मानकरी ठरला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत फायनलमध्ये पाकिस्तानचा दारूण पराभव केला.

कोणाकडून कॅप्टन्सीचे धडे गिरवले? सूर्यकुमार म्हणाला..

आशिया कपमध्ये टीम इंडिया चॅम्पियन झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने एनडीटीव्हीसोबत संवाद साधला. यादरम्यान सूर्याने अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये कॅप्टन्सी करण्याचं कौशल्य कोणकडून शिकलं? असा प्रश्न सूर्यकुमारला विचारण्यात आला. यावर सूर्या म्हणाला, टीम इंडियाचं नेतृत्व करण्याचं कौशल्य दुसरा तिसरा कोणी नाही, तर भारताचा वनडे क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्माकडून शिकलो आहे. 

नक्की वाचा >> Video : कुलदीपने PAK च्या फलंदाजांची नांगी ठेचली! संजू बनला 'स्पायडर मॅन', हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल

ACC च्या निर्णयावर सूर्यकुमारने व्यक्त केली नाराजी

आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने मोठा विजय मिळवल्यानंतर सेलिब्रेशन सेरेमनीला एक तासांहून अधिक कालावधी लागल्याचं पाहायला मिळालं. कारण भारतीय क्रिकेट संघाने एशियन क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याहस्ते विजयी ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दर्शवला. त्यामुळे टीम इंडियाने ट्रॉफीशिवायच विजयी गुलाल उधळला. परंतु, एसीसीच्या या निर्णयावर सूर्यकुमारने तीव्र नाराजी व्यक्त केली. 

Advertisement

नक्की वाचा >> मैदानात रंगला TOSS वॉर! PAK च्या कॅप्टनकडे रवी शास्त्रींनी केलं दुर्लक्ष,वकार युनिसनेही 'असं' काही केलं..Video ची होतेय तुफान चर्चा

भारताने आशिया कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यावदने पत्रकार परिषदेत म्हटलं, मी जेव्हापासून क्रिकेट खेळत आहे, तेव्हापासून पहिल्यांदाच असं पाहिलं की चॅम्पियन टीमला ट्रॉफी दिली नाही. आम्ही खूप मेहनत घेऊन ही टूर्नामेंट जिंकली आहे. आम्ही हा विजयासाठी पात्र होतो. यापलीकडे मी काहीही बोलणार नाही. माझ्या ट्रॉफी ड्रेसिंग रुममध्ये आहेत. माझ्यासोबत सर्व 14 खेळाडू आणि सर्व सहकारी स्टाफ उपस्थित आहे. हीच माझ्यासाठी खरी ट्रॉफी आहे. नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची नाही, असा निर्णय आम्ही मैदानातच घेतला होता. 

Advertisement