जाहिरात

Video: मैदानात रंगला TOSS वॉर! PAK च्या कॅप्टनकडे रवी शास्त्रींनी केलं दुर्लक्ष,वकार युनिसनेही असं काही केलं..

Ind vs Pak, Asia Cup Final 2025 :  14 सप्टेंबर,21 सप्टेंबर आणि आता 28 सप्टेंबर..आशिया कप फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सलमान आगासोबत हात मिळवणी केली नाही.

Video: मैदानात रंगला TOSS वॉर! PAK च्या कॅप्टनकडे रवी शास्त्रींनी केलं दुर्लक्ष,वकार युनिसनेही असं काही केलं..
Ind vs Pak Asia Cup Final 2025

Ind vs Pak, Asia Cup Final 2025 :  14 सप्टेंबर,21 सप्टेंबर आणि आता 28 सप्टेंबर..आशिया कप फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सलमान आगासोबत हात मिळवणी केली नाही. तसच नाणेफेकीच्या वेळी समालोचक रवी शास्त्री यांनीही सलमान आगाशी संवाद साधला नाही.जे नेहमी नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांशी चर्चा करताना दिसतात.नाणेफेकी दरम्यान समालोचक दोन्ही कर्णधारांशी संवाद साधतात आणि त्यांना संघाच्या रणनीतीबाबत विचारतात. खरंतर क्रिकेटच्या इतिहासातील ही एकप्रकारची जुनी परंपराच आहे. परंतु, भारत-पाकिस्तानच्या आजच्या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगासोबत रवी शास्त्रींनी नाही,तर वकार युनूसने चर्चा केली. नाणेफेक सुरु असताना शास्त्रींसोबत वकार युनूसही उपस्थित होते. 

14 सप्टेंबरला लीग मॅच, 21 सप्टेंबरला सुपर-4 मॅचदरम्यान अशाप्रकारचा नजारा पाहायला मिळाला होता. दरम्यान, आजच्या फायनलमध्ये सूर्यकुमारने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली.आधीच्या सामन्यांमध्येही भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हातमिळवणी करणं नाकारलं होतं. अशाचप्रकारे आजच्या सामन्यातही दोन्ही संघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष करत मैदानातील क्रिकेटचं युद्ध सुरु केलं. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरोधात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला होता. 

नक्की वाचा >> Ind vs Pak: कुलदीपने PAK च्या फलंदाजांची नांगी ठेचली! संजू बनला 'स्पायडर मॅन',हवेती उडी मारून घेतला अप्रतिम झेल, Video पाहाच

आयसीसीकडून सूर्यकुमारवर दंडात्मक कारवाई

भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या मैदानातील शीतयुद्धामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हारिस रौफ ICC कोड ऑफ कंडक्टमध्ये दोषी ठरले. सूर्या आणि हारिस रौफ दोघांवरही मॅच फी च्या 30 टक्क्यांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

सामन्यात हँडशेक करण्या आवश्यकता आहे?

आयसीसीच्या नियमानुसार सामन्यादरम्यान हँडशेक करणं अनिवार्य नाही. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलच्या नियमावलीत अशाप्रकारची कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.अंपायर किंवा खेळाडू सामन्यापूर्वी किंवा सामन्यानंतर हँडशेक करतात, ते फक्त खेळाडू वृत्ती (Sporting Spirit) म्हणूनच करतात. ही परंपरा क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही पाहायला मिळते. 

नक्की वाचा >> Online Betting Case: ईडीच्या रडारवर दिग्गज सेलिब्रिटी!युवराज सिंग, शिखर धवनसह 'या' क्रिकेटर्सची संपत्ती होणार जप्त?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com