India Vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाने 340 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाचा डाव अवघ्या 155 धावांवर आटोपला, त्यामुळे या सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव झाला. यासोबतच टीम इंडियाचे टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचेही स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
कांगारूंंच्या संघाने पहिल्या डावात 105 धावांची आघाडी घेतल्याने चौथ्या दिवसअखेर संघाची एकूण आघाडी 333 धावांची होती. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आपल्या डावात आणखी फक्त 6 धावा जोडता आल्या, त्यामुळे त्यांचा दुसरा डाव 234 धावांत आटोपला. अखेरच्या दिवशी 340 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली पहिल्या सत्रात बाद झाले. त्यानंतर भारतीय संघाची पडझड सुरु झाली ती पुन्हा सावरु शकली नाही. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे स्टार खेळाडू कर्णधार रोहित शर्मा 9, केएल राहुल 0, विराट कोहली 5, रवींद्र जडेजा 2, नितीश कुमार रेड्डी 1 धाव करून बाद झाले. दुसरीकडे यशस्वी जयस्वालने एकहाती किल्ला लढवत 84 धावांची झुंजार खेळी केली. मात्र तो विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
चौथ्या दिवशी 9 गडी गमावून 333 धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 5व्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी 6 धावांची भर घातली आणि भारताला 340 धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य पार करणे म्हणजे टीम इंडियासाठी इतिहास रचण्यासारखे झाले असते कारण आतापर्यंत या मैदानावर सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग 332 धावांचा होता, मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 155 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 84 धावा केल्या. त्याने 208 चेंडूंचा सामना करत या धावा केल्या. जैस्वाल व्यतिरिक्त, ऋषभ पंत संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, ज्याने 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 30 धावांची खेळी केली.