IND vs ENG: अभिषेक शर्माचा वानखेडेत धमाका, रोहित शर्माचा विक्रम मोडता मोडता राहीला

सर्वात जलद शतक झळकावण्याचं रेकॉर्ड तोडण्यात अभिषेकला यश आलं नसलं तरी त्याने रोहित शर्माचा एक रेकॉर्ड मात्र मागे टाकला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारत आणि इंग्लंड यांच्यातला शेवटचा T20 सामना वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामना अभिषेक शर्माने आपल्या धमाकेदार फलंदाजीने गाजवला. अभिषेक शर्माने इंग्लिश गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. त्याने शतक झळकवले. या शतकी खेळीत त्याने 13 षटकार आणि 7 चौकार लगावले. विशेष म्हणजे त्याने आपलं शतक केवळ 37 चेंडुत झळकावलं. पण रोहित शर्माचा विक्रम मोडण्यात तो थोडक्यात चुकला. मात्र वानखेडेवर आलेल्या क्रिकेट चाहत्यांना त्याने निराश केले नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारत आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची T20 मालिका खेळली गेली. त्यातला शेवटचा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजासाठी आमंत्रित केले. भारताच्या डावाची सुरूवात संजू सॅमसन बरोबर अभिषेक शर्माने केली. या सामन्यातही संजू सॅमसन अपयशी ठरला. त्याला केवळ 16 धावा करता आल्या. मात्र अभिषेक शर्मा हा रंगात दिसत होता. त्याने मैदानाच्या चारही बाजूला फटके मारणे सुरू ठेवले होते. 

ट्रेंडिंग बातमी - Mahayuti News: ठाकरे- शिंदे एकत्र येणार? शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्यामुळे महायुतीत जुंपली

अभिषेकने बघता बघता 17 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सर्वात कमी चेंडूनत म्हणजेच 12 चेंडूत अर्धशतक करण्याचे रेकॉर्ड युवराज सिंहच्या नावावर आहे. मात्र अभिषेक आता सर्वात जलद गतीने अर्धशतक झळकावणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभिषेकने त्यानंतर अवघ्या 37 चेंडुत आपले शतकही पुर्ण केले. या खेळीत त्याने 13 षटकार आणि 7 चौकार लगावले. भारताकडून सर्वात जलद शतक नोंदवण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने 35 चेंडुत शतक केले आहे. हे रेकॉर्ड अभिषेत शर्माला मोडता आले नाही. ते थोडक्यात चुकले. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

दरम्यान सर्वात जलद शतक झळकावण्याचं रेकॉर्ड तोडण्यात अभिषेकला यश आलं नसलं तरी त्याने रोहित शर्माचा एक रेकॉर्ड मात्र मागे टाकला आहे. एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आता अभिषेकच्या नावावर झाला आहे. या सामन्यात अभिषेकने तब्बल 13 षटकार ठोकले आहेत. या आधी हे रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर होते. रोहितने टी ट्वेंटी सामन्यात 10 षटकार लगावले होते. हे रेकॉर्ड आता अभिषेकने आपल्या नावावर केले आहे. 

Advertisement