India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर पाचवा आणि शेवटचा सामना सध्या सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने त्यांच्या दुसऱ्या डावात एक विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने सलामीवीर जॅक क्रॉलीला बाद केले. क्रॉलीला 14 धावा केल्या तर बेन डकेट ३४ धावा काढून नाबाद परतला. इंग्लंडला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी अजूनही 324 धावा करायच्या आहेत, तर त्यांच्या हातात नऊ विकेट शिल्लक आहेत. ही मालिका बरोबरीत आणण्यासाठी टीम इंडियाला सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला 324 धावांच्या आत गुंडाळावे लागेल. या मालिकेत इंग्लंड 2-1 ने पुढे आहे.
Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय?
यशस्वीने शतक ठोकले
यशस्वी जयस्वालने ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकले. त्याने 118 धावांची शानदार खेळी केली. या कसोटी मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. याशिवाय रवींद्र जडेजाने 66 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 53 धावांची वेगवान खेळी केली. ज्याच्या मदतीने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जोश टोंगने सर्वाधिक 5 बळी घेतले. गस अॅटकिन्सनने तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जेमी ओव्हरटनने दोन बळी घेतले.
ओव्हलमध्ये 148 वर्षांचा इतिहास बदलेल का?
केनिंग्टन ओव्हल हे 1877 मध्ये क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात आलेले मैदान आहे. तेव्हापासून येथे 100 हून अधिक कसोटी सामने खेळले गेले आहेत परंतु शेवटच्या डावात लक्ष्याचा पाठलाग करून केवळ 22 वेळा कोणताही संघ सामना जिंकू शकला आहे. पण खरे आव्हान इंग्लंडला देण्यात आलेल्या लक्ष्याचे आहे. प्रत्यक्षात, या मैदानावरील 148 वर्षांच्या कसोटी इतिहासात एकदाही 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठता आलेले नाही. ओव्हल स्टेडियमवर मिळालेले सर्वात मोठे लक्ष्य 263 धावांचे आहे. हे विक्रमी लक्ष्य इंग्लंडने गाठले आणि त्यांनी 1 विकेटने सामना जिंकला. पण ही कामगिरी इंग्लंडने 123 वर्षांपूर्वी 1902 मध्ये केली होती.
सिराजने विजयाच्या आशा जागवल्या
म्हणजेच, जर इंग्लंडला ओव्हलवर जिंकायचे असेल तर त्याला १२३ वर्षांचा विक्रम मोडावाच लागेल असे नाही तर १४८ वर्षांचा इतिहासही बदलावा लागेल. त्यामुळेच ओव्हलवर टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या. दिवसाच्या शेवटच्या षटकात स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीला शानदार यॉर्करने क्लिन बोल्ड केले तेव्हा या आशा आणखी बळकट झाल्या. क्रॉलीने बेन डकेटसह इंग्लंडसाठी अर्धशतकी भागीदारी केली होती, परंतु सिराजने तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याचा खेळ संपवला. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने १ विकेट गमावून ५० धावा केल्या होत्या.
IND Vs ENG: ओव्हल टेस्टमध्ये राडा! के एल राहुल थेट पंचांना नडला; पाहा VIDEO