- भारत अ संघाने श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 278 धावांचे आव्हान दिले होते
- सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 114 चेंडूंत 101 धावांची शतकीय खेळी करत भारताला मजबूत सुरुवात दिली
- श्रीलंका अ संघाला भारत अ संघाने पराभवाची धुळ चारली
Arshad Khan, Ruturaj Gaikwad, SL A vs IND A: श्रीलंका येथे सुरू असलेल्या तिन देशाच्या मालिकेत भारत 'अ' संघाने आपली सुरुवात अत्यंत थरारक विजयाने केली आहे. शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्या टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक करत विजय नोंदवला. हा सामना श्वास रोखून धरणाराच ठरवा. एक वेळ श्रीलंका A संघ सामना जिंकेल अशी स्थिती होती. पण भारताने श्रीलंका 'अ' संघाचा 8 धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 269 धावांवर आटोपला.
टॉस जिंकून पहिले बॅटींग करण्याचा निर्णय भारत 'अ' संघाने घेतला. 50 ओव्हर्समध्ये भारत A संघाने 6 बाद 277 धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 114 चेंडूंत 101 धावांची शतकीय खेळी केली. त्याच्या या खेळीने भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. हे त्याचे लिस्ट-ए कारकिर्दीतील 21 वे शतक होते. कॅप्टन तिलक वर्माने त्याला चांगली साथ दिली. त्याने 60 धावा केल्या.
भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. निरोशन डिकवेला (47) आणि अविष्का फर्नांडो (45) यांनी 93 धावांची सलामी दिली. मात्र श्रीलंकेची मधली फळी कोसळली. कर्णधार साहन अराचिगेने 74 धावांची झुंजार खेळी केली. त्यावेळी श्रीलंक हा सामना जिंकेल असे वाटत होते. शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये श्रीलंकेला जिंकण्यासाठी 10 धावा हव्या होत्या. त्यामुळे 12 चेंडू आणि 10 धावा हव्या होत्या.
3 WICKETS IN THE 49th OVER INCLUDING A RUN-OUT BY RUTU 🔥
— Johns. (@CricCrazyJohns) June 9, 2026
- What a comeback victory by India A, Ruturaj is the hero & POTM. pic.twitter.com/z8qfr6nMIe
त्यामुळे सामना रोमांचक वळणावर आला होता. 49 वी ओव्हर अर्शद खानने टाकली. त्याचीच ओव्हर मॅचची टर्निंग पाँईंट ठरली. श्रीलंकेच्या तिन विकेट शिल्लक होत्या. दुसऱ्या बाजूला वानुजा सहान 16 बॉलवर 23 रन्स काढून खेळत होता. अर्शदच्या पहिल्या चेंडूवर त्याने एक धाव काढली. पुढच्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. तिसऱ्या चेंडूवर रन आऊट झाला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या. चौथा बॉल निर्धाव टाकला. पण पाचव्या चेंडूवर अर्शदने विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. श्रीलंकेचा डाव 269 वर आटोपला. भारताने आठ धावाने विजय मिळवला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world