- श्रीलंकेत भारत A, श्रीलंका A आणि अफगाणीस्तान A यांच्यातील त्रिकोणी मालिका चालू आहे
- भारत A विरुद्ध श्रीलंका A सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि विशेन हलमबागे यांच्यात राडा झाला
- मॅच रेफरी प्रदीप जयप्रगाश यांनी वैभव सूर्यवंशी आणि हलमबागे यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची जोरदार चर्चा होती. त्याने आपल्या बॅटींगच्या जिवावर संपूर्ण क्रिकेट जगताला त्याची दाद घ्यायला लावली. आता तो पून्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो त्याच्या बॅटींगमुळे नाही तर मैदानातील एका राड्यामुळे चर्चेत आला आहे. या राडा त्याला भोवण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यासाठी त्याला मोठी शिक्षा ही ठोठावली जावू शकते. श्रीलंकेत सध्या तिन देशांची मालिका सुरू आहे. ही मालिका भारत A, श्रीलंका A आणि अफगाणीस्तान A या संघात मालिका होत आहे. या मालिकेत श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा राडा झाला होता. त्यावरून आता त्याला दंड ठोठावला जावू शकतो. शिवाय श्रीलंकेच्या खेळाडूंनाही याचा फटका बसणार आहे.
श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेत बुधवारी भारत A संघाने अफगाणिस्तान A चा पराभव केला. या विषयासाठी भारत A संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. असं असलं तरी संघा समोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागिल श्रीलंके विरुद्ध झालेल्या मॅच दरम्यान जो राडा झाला त्याची चर्चा मात्र थांबलेली नाही. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याच्या अडचणी मात्र या राड्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. या वादामुळे त्याच्यावर आता मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेचा विशेन हलमबागे या दोघांवर 50-50 टक्के मॅच फीची शिक्षा करावी अशी शिफारस करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ वैभव आणि हलमबागे यांना शिक्षा होणार नाही, तर भारता A चा कॅप्टन तिलक वर्मा याला ही दंड होणार आहे. त्याला निष्काळजीपणासाठी 30 टक्के दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला याच्यावर 20 टक्के दंड ठोठावण्याची शिफारस आहे. मॅच रेफरी प्रदीप जयप्रगाश यांनी ही शिफारस केलीय. गेल्या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंशी झालेल्या वादविवादानंतर वैभव सूर्यवंशीने हलमबागेला धक्का दिल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ज्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरील वातावरण कमालीचे तापले होते. त्याची दखल घेवून कारवाई केली जाणार आहे.
या वादाची सुरूवात श्रीलंकेच्या खेळाडूंनी केली. टूर्नामेंटच्या सुरुवातीपासूनच श्रीलंकेचे खेळाडू आक्रमक होते. ते वैभव सूर्यवंशी आणि इतर भारतीय खेळाडूंना आयपीएल (IPL) कामगिरीवरून छेडत होते. मात्र, वरिष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे ‘A' संघांच्या सामन्यांमध्ये आयसीसी थेट कारवाई करत नाही. मॅच रेफरींनी आपला अहवाल बीसीसीआय (BCCI) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे सोपवला आहे. दंडाचा अंतिम निर्णय आता हे दोन्ही बोर्ड घेतील. हा वाद मैदानातील शिस्तीचा भंग करणारा आहे. तरुण खेळाडूंनी आक्रमकता दाखवताना खेळाच्या मर्यादेचे भान ठेवणे गरजेचे आहे. मॅच रेफरींनी घेतलेला हा निर्णय युवा क्रिकेटपटूंना भविष्यासाठी एक कडक संदेश देणारा ठरेल असं बोललं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world