भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहीला आहे. रविद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या भन्नाट बॅटींग पुढे इंग्लंडच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी शुभमन गिल आणि केएल राहुल यांना बाद केले. पण पुढची सर्व सत्र भारताने आपल्या नावे केली. रविंद्र जडेजा पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदर यांनेही आपलं शतक पूर्ण केलं. हा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं. त्यामुळे पाच कसोटी सामन्याची ही मालिका सध्या दोन एक अशा स्थितीत आहे. शेवटचा कसोटी सामना ओव्हलवर होणार आहे. त्यामुळे ही मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी भारताला आहे. भारताने 425 धावा केल्या. त्या बदल्यात चार विकेट गमावल्या. जाडेजा आणि सुंदरने 203 धावांना नाबाद भागिदारी केली.
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी सावध पवित्रा घेतला. केएल राहुल याला आपलं शतक पुर्ण करता आलं नाही. तो 90 धावांवर बाद झाला. त्याला बेन स्टोकने बाद केले. त्यानंतर भारताचा कॅप्टन शुभमन गिल याने चांगली खेळी करत आपलं शतक पुर्ण केलं. त्याने 103 धावा केल्या. या मालिकेतील गिलचे हे चौथे शतक होते. तो 103 धावांवर बाद जाला. त्यानंतर मात्र रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना इंग्लंडच्या गोलंदाजांची पिस काढली. एका ही इंग्लंडच्या गोलंदाजाला या दोघांवर वर्चस्व गाजवता आले नाही. पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यानंतर जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला. रविंद्र जाडेजाने आपलं शतक पुर्ण केलं.
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा
चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंतला पहिल्या दिवशी पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अर्धशतक झळकावले. भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात आला. बेन स्टोक्सने 5 बळी घेतले. पंत व्यतिरिक्त, साई सुदर्शन (61) आणि यशस्वी जयस्वाल (58) यांनी अर्धशतके झळकावली.
(नक्की वाचा : Jasprit Bumrah : शुबमन गिल कॅप्टन कसा झाला? जसप्रीत बुमराहनं सांगितली Inside Story )
इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावा केल्या, जो रूट (150) आणि बेन स्टोक्स (141) यांनी शतके झळकावली. त्याआधी, बेन डकेट (94) आणि झॅक क्रॉली (84) यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या डावाच्या आधारे, इंग्लंडने 311 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूपच वाईट झाली. ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांना बाद केले, दोन्ही फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. यानंतर, चौथ्या दिवशी, शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी विकेट वाचवली होती. चौथ्या दिवसाच्या खेळाअखेरीस, भारताचा स्कोअर 174/2 होता.