IND vs PAK u19 Final : अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीला डिवचण्याचा प्रयत्न केला.पहिल्याच चेंडूपासून त्याला लक्ष्य केले आणि तो बाद झाल्यानंतर तर वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. दुबईत आज रविवारी अंडर-19 आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला. या सामन्यात पाकिस्तानने 50 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 347 धावांचा डोंगर रचला होता. पाकिस्तानने दिलेल्या 348 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ 156 धावांवर सर्वबाद झाला.
त्यामुळे पाकिस्ताने हा फायनलचा सामना 191 धावांनी जिंकला. पंरतु, या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. पाकिस्तानच्या खेळाडूंनी वैभवला डिवचल्यानंतर मैदानात जे घडलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की वाचा >> Election 2025 : राज्यातील 288 नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी नगराध्यक्षांची नावे एका क्लिकवर
वैभवने पाकिस्तानच्या गोलंदाजाला जशाच तसं उत्तर दिलं
वैभव मैदानात फलंदाजीला उतरल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू त्याला उकसवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होते. वैभवने 10 चेंडूत 26 धावा कुटल्या. पण अली रझाच्या गोलंदाजीवर वैभव झेलबाद झाला. त्यानंतर अलीने वैभवसोबत असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला.