IND vs PAK u19 Final : अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीला डिवचण्याचा प्रयत्न केला.पहिल्याच चेंडूपासून त्याला लक्ष्य केले आणि तो बाद झाल्यानंतर तर वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. दुबईत आज रविवारी अंडर-19 आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला. या सामन्यात पाकिस्तानने 50 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 347 धावांचा डोंगर रचला होता. पाकिस्तानने दिलेल्या 348 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ 156 धावांवर सर्वबाद झाला.
त्यामुळे पाकिस्ताने हा फायनलचा सामना 191 धावांनी जिंकला. पंरतु, या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. पाकिस्तानच्या खेळाडूंनी वैभवला डिवचल्यानंतर मैदानात जे घडलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की वाचा >> Election 2025 : राज्यातील 288 नगरपालिकांमध्ये कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी नगराध्यक्षांची नावे एका क्लिकवर
वैभवने पाकिस्तानच्या गोलंदाजाला जशाच तसं उत्तर दिलं
वैभव मैदानात फलंदाजीला उतरल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू त्याला उकसवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होते. वैभवने 10 चेंडूत 26 धावा कुटल्या. पण अली रझाच्या गोलंदाजीवर वैभव झेलबाद झाला. त्यानंतर अलीने वैभवसोबत असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला.
Ali Raza showing levels to a batter who's 14 from last 4,5 years.🫣🫣pic.twitter.com/k0uCahTvRa
— Rinchan (@girdeh) December 21, 2025
नक्की वाचा >> Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?
इथे पाहा भारत-पाकिस्तान सामन्याचा व्हायरल व्हिडीओ
🚨 Heated exchange between Ayush Mahtre and Pakistani bowler Ali Raza during the Under-19 Asia Cup final 🔥 pic.twitter.com/UmlsGOUJwc
— MuFFatLal Bohra (@arshdeep3444) December 21, 2025
वैभव बाद झाल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजाने त्याला डिवचलं. तेव्हा वैभवनेही अली रझाला असे प्रत्युत्तर दिलं, जे पाहून पाकिस्तानी संघच नव्हे तर त्यांचे समर्थकही चांगलेच अस्वस्थ झाले. अलीने वैभवसोबत शाब्दिक चकमक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वैभवनेही त्याला जशाच तसे उत्तर दिले. पाकड्यांनी फक्त वैभवलाच नाही, तर आयुष म्हात्रेचीही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world