धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात चांगली झाली नाही. राहुल त्रिपाटी, रुतुराज गायकवाड आणि दिपक हुडा हे फार काही न करता आऊट झाले. राहुल त्रिपाटी पाच धावा काढून बाद झाला. त्याला हेजलवूडने बाद केले. तर कर्णधार रुतुराज गायकवाड याला खाते ही खोलता आले नाही. त्यालाही हेजलवूडने तंबूत पाठवले. त्यानंतर दिपक हुडालाही चांगला खेळ करता आला नाही. तो अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्याला भूवनेश्वर कुमारने आऊट केले. सॅम करन ही आठ धावा करून बाद झाला. त्यामुळे चेन्नची अवस्था बिकट झाली होती. 10 षटकात चेन्नईला 65 धावा करता आल्या. त्यात त्यांचे चार फलंदाज बाद झाले. धोनीची ही जादू चालली नाही. रविंद्र जडेजाने मात्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण चेन्नईला 20 षटकात 146 धावा करता आल्या. चेन्नईचा पन्नास धावांनी पराभव झाला. धोनीने 16 चेंडूत 30 धावा केल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सचिन रविंद्रने एकाकी लढत दिली. त्याने 31 चेंडूत 41 धावा केल्या. तर शिवम दुबेने 15 चेंडूत 19 धावा केल्या. त्याला मोठी खेळू उभी करता आली नाही. पंधरा षटकातच चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला होता. जॉश हेजलवूड आणि यश दयाळ यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांना भुवनेश्वर कुमार आणि कुणाल पंड्याची चांगली साथ मिळाली. पहिल्या पासूनच चेन्नईच्या फलंदाजांना बंगळूरुच्या गोलंदाजांनी बांधून ठेवलं होतं.
ट्रेंडिंग बातमी - RCB vs CSK: बंगळूरुचे चेन्नई समोर 197 धावांचे आव्हान, रजत पाटीदारचे अर्धशतक
त्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई समोर 197 धावांचे लक्ष ठेवले होते. त्यात सर्वाधिक धावा कर्णधार रजत पाटीदार यांने केल्या. तो 51 धावा करून बाद झाला. त्याने तिन षटकरा आणि दोन चौकार लगावले. तर टिम डेव्हिडने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. त्याने आठ चेंडूत 22 धावा केल्या. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी बंगळूरच्या डावाची सुरुवात केली.
सॉल्ट यांने आक्रमक भूमीका घेत 16 चेंडूत 32 धावा केल्या. त्यात एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे. त्याला. नूर अहमदच्या गोलंदाजीवर त्या धोनीने स्टम्पिंग केले त्यानंतर देवदत्त पाडिक्कल याने 14 चेंडूत 27 धावांची खेळी केली. त्यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याला आर अश्वीनने बाद केले.
विराट कोहलीची ही काही जादू चालली नाही. त्याने संथ फलंदाजी करत 30 चेंडूत 31 धावा केल्या. त्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. त्यालाही नूर अहमदने बाद केले. लियाम लिविंगस्टोन याला ही जास्त वेळ मैदानात उभं राहाता आलं नाही. त्याने नऊ चेंडूत दहा धावा केल्या. त्यात एक षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे कर्णधार रजत पाटीदार हा खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता.